शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 18:54 IST

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून न्यायालयाला अहवाल सादर केला. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डीएसके यांच्या ब्रेनमध्ये ब्लडक्लॉथ असल्याने त्यांची वेळोवेळी एमआरआय चाचणी करण्याची आवश्यकता आहे़ त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातच उपचार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयात केली होती. विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य केली होती. मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर आणि ससूनमधील मेडिकल टीमने शुक्रवारी पुन्हा तपासणी करावी. पोलिसांच्या चौकशीच्या दृष्टीने तंदुरुस्त आहेत का याचा अहवाल द्यावा, असे आदेश दिले होते. त्याप्रमाणे वैद्यकीय पथकाने डीएसके यांची तपासणी केली. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचा अहवाल दिला. त्यानुसार न्यायालयाने त्यांना आणि पत्नी हेमंती कुलकर्णी  यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

कोल्हापूर पोलिसांनाही हवा ताबापुण्याबरोबरच डीएसके यांच्यावर कोल्हापुरातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनाही डीएसके यांचा ताबा हवा आहे. कोल्हापूर पोलिसांनीही डीएसके यांचा ताबा मिळविण्यासाठी पुणे न्यायालयात अर्ज केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे पावणेतीनशे जणांनी गुंतवणूक केली होती. या प्रकरणी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे ४ हजार पेक्षा जास्त लोकांची सुमारे २८५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीkolhapurकोल्हापूरPuneपुणे