शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

काेंढव्यात सिलेंडरचा स्फाेट, ज्येष्ठ महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 14:44 IST

गॅस लीक झाल्याने सिलेंडरचा स्फाेट हाेऊन घरातील सामानाला अाग लागल्याची घटना काेंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीत घडली. या स्फाेटात एक महिला जखमी झाली अाहे.

पुणे : काेंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये सिलेंडरचा स्फाेट हाेऊन एक ज्येष्ठ महिला जखमी झाली अाहे. रविवारी दुपारी साडेअाकराच्या सुमारास ही घटना घडली. सिलेंडरमधील गॅस घरात पसरल्याने त्याचा स्फाेट झाला. अग्निशामक जवानांनी धाव घेत जखमी महिलेला नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.    नरगीस अब्दुल राेफ पटेल (वय 73) ह्या या अागीत जखमी झाल्या अाहेत. त्यांना सूर्या हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात अाले अाहे. तर त्यांचे पती अब्दुल राेफ पटेल यांना किरकाेळ जखमा झाल्या अाहेत. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेअाकराच्या सुमारास अग्निशामक दलाला सिलेंडरचा स्फाेट झाल्याचा फाेन अाला. घरात पटेल नवरा-बायकाे दाेघेच राहतात. वयाेमानामुळे घरात गॅस लीक झाल्याचे दांपत्याच्या लक्षात अाले नसावे. त्यांनी कुठलेतरी इलेक्ट्राॅनिक उपकरण सुरु केल्यामुळे सिलेंडरचा स्फाेट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे. हा स्फाेट इतका भीषण हाेता की त्याच्या हादऱ्याने इमारतीखाली असलेल्या एका कारची काच फुटली. तसेच घरातील इतर सामानाचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. सिलेंडरच्या स्फाेटामुळे घरातील पडद्यांना व कपड्यांना अाग लागली हाेती. तसेच बाल्कणीतल्या प्लॅस्टिकच्या पत्र्यांना अागीने घेरले हाेते. शेजारील नागरिकांनी पाण्याचा मारा करत अाग विझवण्याची प्रयत्न केला. बाल्कणीतल्या पत्र्याला लागलेल्या अागीमुळे वरच्या फ्लॅटमधील बाल्कणीमधील काही वस्तूंना अाग लागली. पटेल यांच्या अाजूबाजूच्या फ्लॅटचेही या स्फाेटामुळे काहीप्रमाणात नुकसान झाले.     स्फाेटाची माहिती मिळाल्यानंतर काेंढव्यातील दाेन फायर गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. घुमसत असलेली अाग विझवत जवानांनी जखमी नरगीस पटेल यांना रुग्णालयात दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत काेंढव्याचे स्टेशन अाॅफिसर प्रभाकर उमराटकर घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोट