पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:14+5:302021-01-08T04:29:14+5:30
धनकवडी : स्वच्छ व स्वस्थ नवे वर्ष अंतर्गत युथ कनेक्ट फोरमच्या वतीने पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी नुुुकतीच शहरात सायकल फेरी ...

पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल फेरी
धनकवडी : स्वच्छ व स्वस्थ नवे वर्ष अंतर्गत युथ कनेक्ट फोरमच्या वतीने पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी नुुुकतीच शहरात सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शहरातील युवक, डॉक्टर ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. फोरमचे अध्यक्ष राहूल पोटे व सामाजिक कार्यकर्ते सुशांत ढमढेरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुशांत ढमढेरे म्हणाले लोकांचा योग्य प्रतिसाद नसल्याने पुणे शहरातील सायकल ट्रॅकचे नियोजन फिस्कटले आहे. थोड्या थोड्या अंतरावरही पायी किंवा सायकलचा उपयोग न करता ‘मोटर’ वाहन काढले जाते. यामुळे प्रदूषणाचा स्तरही वाढला आहे. कमी अंतरासाठी सायकलीचा उपयोग हा सर्वोत्तम पर्याय आहे. यातून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल व आरोग्यही सुदृढ राहील. सायकल केंद्रित’ जीवन शैलीसाठी लोकांनी आग्रही असले पाहिजे. यावेळी स्वाती पोकळे, नितीन कदम, संतोष नागरे, राकेश कामटे, महेश हांडे, अश्विनी परेरा उपस्थित होते.
--
०४ धनकवडी सायकल