शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट करणाऱ्या तरुणास सायबर क्राईम सेलने पुण्यात केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 18:46 IST

एका उच्च शिक्षित तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचा फोटो व मोबाईल नंबर अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर क्राईम सेलने तरुणाला अटक केली आहे.

ठळक मुद्देआरोपी व पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे, झाला होता वैयक्तिक वादआपले फोटो शेअर करताना काळजी घ्यावी़ : सायबर क्राईम सेल

पुणे : कात्रज भागात राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणीला रात्री अपरात्री वेगवेगळ्या व्यक्तींचे फोन येऊ लागल्याने ती हैराण झाली़ फोनवरील व्यक्तीला माझा नंबर कोणी दिला अशी या तरुणीने चौकशी केल्यावर तुमच्या नावाचे फेसबुक अकाऊंट असून त्यावर तुमचा फोटो व मोबाईल नंबर असल्याचे तिला सांगण्यात आले़ दुसऱ्या दिवशी या तरुणीने सायबर कॅफेमध्ये जाऊन स्वत:चे फेसबुक अकाऊंट चेक केल्यावर तिच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट व त्यावर तिचा फोटो व मोबाईल नंबर अपलोड केल्याचे दिसून आले़ सायबर क्राईम सेलने याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे़ नितीन दत्तात्रय बंड (वय २८, रा़ जळगाव जामोद, जि़ बुलढाणा) असे या तरुणाचे नाव आहे़ भारती विद्यापीठ पोलिसांकडे या तरुणीने फिर्याद दिली आहे़ सायबर क्राईम सेल यांच्या मार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता़ त्यानुसार या सेलने पीडित तरुणीच्या फेसबुकबाबतची माहिती प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषण केले़ त्यावरुन हे बनावट अकाऊंट नितीन बंड याने तयार केलेल्या निष्पन्न झाले़ त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली़ तेव्हा हा आरोपी व पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत़ त्यांच्या वैयक्तिक वाद झाला होता़ त्यातून बदनामी करण्यासाठी त्याने तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले व त्यावर तिचा फोटो व मोबाईल नंबरही अपलोड केला होता़ ही कामगिरी सायबर क्राईम सेलच्या पोलीस उपनिरीक्षक सोनाली फटांगरे, पोलीस नाईक अजित कुरे, नितेश बिचेवार, शुभांगी मालुसरे यांनी केली़ फेसबुक या सोशल वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यातून तरुणींना त्रास देण्याचा प्रकार वाढू लागले आहेत़ त्यामुळे आपले फोटो शेअर करताना काळजी घ्यावी़ आपल्यासोबत किंवा आपल्याजवळील व्यक्तींसोबत असा काही प्रकार झाल्यास सायबर क्राईम सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़ 

टॅग्स :Facebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइमPuneपुणे