लिटरनी रॉकेलच्या कोट्यात कपात

By Admin | Updated: January 28, 2015 23:38 IST2015-01-28T23:38:15+5:302015-01-28T23:38:15+5:30

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गतवर्षीपेक्षा ९५ हजार ५५६ लिटर रॉकेलची कपात केली आहे. १ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा करून ऐन थंडीत घाम फोडण्याचा प्रकार जिल्ह्याच्या पुरवठा शाखेने केला.

Cut into liter of kerosene | लिटरनी रॉकेलच्या कोट्यात कपात

लिटरनी रॉकेलच्या कोट्यात कपात

इंदापूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गतवर्षीपेक्षा ९५ हजार ५५६ लिटर रॉकेलची कपात केली आहे. १ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा करून ऐन थंडीत घाम फोडण्याचा प्रकार जिल्ह्याच्या पुरवठा शाखेने केला.
इंदापूर तालुक्यात ८२ हजार १६८ शिधापत्रिका आहेत. रॉकेलची तालुक्याची गरज ७ लाख ३७ लिटर आहे. शहरातील २० दुकानांसह एकूण ३०५ दुकानांद्वारे गेल्या वर्षीपर्यंत २ लाख ४० हजार लिटर रॉकेल तालुक्यात वितरित होत होते.
नव्या वर्षात त्यामध्ये ९५ हजार ५५६ लिटरची कपात करण्यात आली. १ लाख ४४ हजार लिटर रॉकेल आले. माणशी ४०० मिलिप्रमाणे वाटप करण्याचे निर्देश तालुक्यातील पुरवठा शाखेने दिले.

Web Title: Cut into liter of kerosene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.