शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीविषयी आक्षेपार्ह बोलला म्हणून कापले मित्राचे गुप्तांग, पुण्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 14:21 IST

दारू पिताना पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्याराने मित्राचे गुप्तांग कापून बेदम मारहाण करण्यात आली. हवली तालुक्यातील पेठ येथील मार्गवस्ती येथे बुधवारी (ता. १७) रात्री १० वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देसुनील रघुनाथ कटके यास लोणी काळभोर पोलिसांनी घेतले ताब्यातलोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांनी जखमीची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली

कोरेगाव मूळ : दारू पिताना पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने झालेल्या भांडणात तीक्ष्ण हत्याराने मित्राचे गुप्तांग कापून बेदम मारहाण करण्यात आली. हवली तालुक्यातील पेठ येथील मार्गवस्ती येथे बुधवारी (ता. १७) रात्री १० वाजता ही घटना घडली.देवांग चंद्रकांत देसाई (वय ५१, सध्या  मार्गवस्ती, नायगाव, ता. हवेली मूळ रा. नवसारी, ता. जमापूर, गुजरात) असे जखमीचे नाव असून त्यास मारहाण केल्याप्रकरणी सुनील रघुनाथ कटके (रा. मार्गवस्ती, नायगाव, ता. हवेली) यास लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी देवांग देसाई व सुनील कटके हे मित्र असून देवांग देसाई हा नायगाव हद्दीतील मार्गवस्ती परिसरातील फ्रेश पोल्ट्रीवर व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. देसाई यांच्या पत्नी गावी गेल्या होत्या. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोघेही पोल्ट्री फर्मावरील एका खोलीत दारू पीत बसले होते. दोघांमध्ये चेष्टा मस्करी चालू असताना सुनील कटके याने देसाईला एकटपणावरून चिडवले, त्यास प्रत्युत्तर म्हणून देसाई याने सुनील कटकेच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे चिडलेल्या सुनीलने देसाईवर जवळच पडलेल्या तीक्ष्ण हत्याराने वार करण्यास सुरुवात केली. यात त्याने देसाई याच्या गुप्तांगावर वार केले. मारहाणीनंतर सुनीलने देसाई याला खोलीत बंद करून तेथून निघून गेला. जखमी अवस्थेतील देसाई याने आपल्या जवळील फोनवरून मित्राला बोलावून स्वत: लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. दरम्यान लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोंडूभैरी यांनी जखमीची विचारपूस करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी तातडीने सुनील कटके यास ताब्यात घेतले असता वरील घटनेचा उलगडा झाला. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणे