मोबाईल अ‍ॅपद्वारे ग्राहकांचे मीटर रीडिंग

By Admin | Updated: February 15, 2017 01:29 IST2017-02-15T01:29:45+5:302017-02-15T01:29:45+5:30

राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाइन सेवा मिळावी. यासाठी वीजग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी ‘महावितरण’च्या वतीने तयार करण्यात

Customer's meter reading through mobile app | मोबाईल अ‍ॅपद्वारे ग्राहकांचे मीटर रीडिंग

मोबाईल अ‍ॅपद्वारे ग्राहकांचे मीटर रीडिंग

बारामती : राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाइन सेवा मिळावी. यासाठी वीजग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी ‘महावितरण’च्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ सात महिन्यांत सुमारे १० लाख ग्राहकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत १ कोटी ७० लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. तसेच, ७ लाख ४३ हजार ग्राहकांनी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला आहे. सुमारे ४५ हजार ८१५ ग्राहकांना अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
या अ‍ॅपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, वीजबिलांची माहिती व बिलांचा भरणा, वीजसेवांविषयी तक्रारी व अभिप्राय इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले नाही, त्यांना अ‍ॅपद्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अ‍ॅप महावितरण वेबसाईट, गुगल प्ले, अ‍ॅपल, विंडोज स्टोअर्स येथे उपलब्ध आहे. राज्यातील सुमारे ३८ हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी ‘कर्मचारी मित्र अ‍ॅप’ डाऊनलोड केले आहे. याद्वारे नवीन वीजजोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचूक वीजमीटर रीडिंग, फिडर व डीटीसी मीटर रीडिंग इत्यादी कामे प्रभावीपणे केली जात आहेत. सुमारे १ कोटी ४ लाख ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोदणी ‘महावितरण’कडे केली आहे. मीटर रीडिंग, वीजबिल, आॅनलाईन बिल, नवीन वीज जोडणीसाठी अर्ज व त्याची सद्य:स्थिती, मीटर वाचन घेतल्याचा व देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे आदीबाबतच्या सूचना एसएमएसद्वारे पाठवित आहेत.

Web Title: Customer's meter reading through mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.