शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील या पेट्राेल पंपावर पेट्राेल साेबत मिळते थंडगार हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:39 IST

पुण्यातील नवी पेठेतील एका भारत पेट्राेल पंपावर उन्हाच्या कडाक्यापासून थंडावा मिळण्यासाठी पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे.

पुणे : सध्या सर्वत्र पाऱ्याने चाळीशी पार केली अाहे. तळपत्या उन्हात नागरिकांच्या अंगाची लाहीलाही हाेत अाहे. त्यातच दुपारच्यावेळी बाहेर पडल्यास उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. त्यामुळे दाेन मिनिक का हाेईना थंडावा मिळावा अशी नागरिकांची इच्छा असते. हीच नागरिकांची गरज लक्षात घेऊन पुण्यातील नवी पेठेतील एका पेट्राेल पंपावर पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे. त्यामुळे दरराेज वाढणारी पेट्राेलची किंमत पाहून नागरिकांचा पारा वाढत असताना या गार वाऱ्यामुळे ताे कमी हाेण्यास मदत हाेत अाहे.     यंदाच्या उन्हाळ्यात पुण्याच्या पाऱ्याने चाळीशी पार केली हाेती. वाढत्या तापमानामुळे घराबाहेर पडणे नागरिकांना कठीण झाले हाेते. विशेषतः कामगार वर्गाचे बरेच हाल हाेत हाेते. हीच नागरिकांची समस्या लक्षात घेऊन नवीपेठेतील भारत पेट्राेल पंपचालकांना थेट नागरिकांसाठी पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पख्यांची साेय केली अाहे. उन्हातान्हातून पेट्राेल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना हा दाेन मिनिटांचा गारवा सुखावून जात अाहे. पाण्याचे तुषार उडविणाऱ्या दाेन पख्यांची व्यवस्था याठिकाणी केली असून सर्व ग्राहकांना या पंख्याची हवा लागेल याची विशेष खबरदारी घेण्यात अाली अाहे. याबाबत बाेलताना या पेट्राेलपंपाचे संचालक अनिष कर्वे म्हणाले, पेट्राेल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना काहीकाळ थंडावा मिळावा यासाठी या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे. माझ्या बाबांची ही कल्पना हाेती. त्यानी एका हाॅटेलमध्ये या प्रकारचे पंखे पाहिले हाेते. अापल्या ग्राहकांसाठी सुद्धा अशी व्यवस्था करावी अशी कल्पना त्यांना सुचली. हे पंखे लावल्याने ग्राहकांना उन्हापासून दिलासा मिळत अाहे. अनेक वाहनचालक पेट्राेल भरल्यानंतर अावर्जुन ही व्यवस्था केल्याबद्ल अाभार मानतात. पावसाळा सुरु हाेईपर्यंत हे पंखे अाम्ही सुरु ठेवणार अाहाेत. 

    ग्राहकांबराेबरच येथील कर्मचाऱ्यांना सुद्धा या पंख्यांमुळे एसीमध्ये काम केल्यासारखे वाटते. तसेच  कामाचा कंटाळा येत नसून फ्रेश वाटत राहते. यंदा या उपक्रमाचे पहिलेच वर्ष असून पुढच्या वर्षीसुद्धा ही व्यवस्था करण्याचा या पेट्राेल पंप चालकांचा मानस अाहे.

टॅग्स :PuneपुणेPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपtwo wheelerटू व्हीलर