शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ग्राहक आयोग नोटिशीला पोलिसांची केराची टोपली, बांधकाम व्यावसायिकाला अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 02:41 IST

ग्राहकांना सदनिका देण्याची घोषणा करून पैसे गोळा केल्यानंतर प्रकल्पच गुंडाळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने व्याजासह नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता.

पुणे  - ग्राहकांना सदनिका देण्याची घोषणा करून पैसे गोळा केल्यानंतर प्रकल्पच गुंडाळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने व्याजासह नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतरही पैसे न देणाºया बांधकाम व्यावसायिकाविरोधात एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा आयोगाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावूनही पुणेपोलिसांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. आता, आयोगाने पुन्हा चौथ्यांदा अटकवॉरंट बजावले असून, १९ नोव्हेंबरला संबंधित बांधकाम व्यावसायिकांना हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.केडीएस इन्फ्रा बिल्डकॉनच्या भूपेंदरसिंग धिल्लन, मारुती बुधाजी कादळे, अभिजित मारुती कादळे (तिघेही रा, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे अटक वॉरंट बजावण्यात आलेल्यांची नावे आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सहयोगाने तब्बल १३२ ग्राहकांनी आयोगाकडे २०१२मध्ये तक्रार दाखल केली होती. केडीएस इन्फ्राच्या बांधकाम व्यावसायिकांनी चºहोली येथे गृहसंकुलाची घोषणा केली होती. ग्राहकांकडून सदनिकेचे पैसे आगाऊ घेतले होते. मात्र, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने हा प्रकल्प पूर्ण केला नाही. त्या विरोधात ग्राहकांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी संबंधित ग्राहकांना १ कोटी ३४ लाख २८ हजार ५१८ रुपये १८ टक्के व्याजाने परत करावेत, असा आदेश १७ फेब्रुवारी २०१६ रोजी केला होता. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी ४ लाख रुपये अशी संपूर्ण रक्कम ९० दिवसांच्या आत देण्याचे आदेशात म्हटले होते.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे अध्यक्ष विजय सागर म्हणाले, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने चºहोली येथे गृहसंकुल प्रकल्प जाहीर करून ग्राहकांकडून पैसे घेतले. मात्र, पुढे हा प्रकल्प झालाच नाही. संबंधित प्रकल्पाची जमीन परस्पर दुसºया व्यक्तीला विकण्यात आली. त्यानंतर आयोगाने आदेश देऊनही ग्राहकांना पैसे दिले गेले नाहीत. तर, संबंधितांविरोधात अटक वॉरंट बजावूनही पुणे पोलीस त्यांना हजर करू शकले नाहीत.आयोगाने बजावले अजामीनपात्र अटक वॉरंटकेडीएस इन्फ्रा बिल्डकॉनने संबंधित रक्कम दिली नसल्याने तक्रारदारांनी पुन्हा आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर आयोगाने २५ आॅगस्ट २०१७, २७ आॅक्टोबर २०१७, २७ एप्रिल २०१८ रोजी बांधकाम व्यावसायिकांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. त्यानंतरही पोलीस संबंधितांना अटक करू शकले नाहीत. आता पुन्हा ३ आॅक्टोबर २०१८ रोजी आयोगाने संबंधितांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले असून, १९ नोव्हेंबरला त्यांना हजर करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे