सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
By Admin | Updated: January 20, 2017 17:23 IST2017-01-20T17:23:36+5:302017-01-20T17:23:36+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 20 - कोथरुड परिसरात एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र दिवसाढवळ्या चोरट्यांनी हिसकावल्याची घटना समोर ...

सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - कोथरुड परिसरात एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र दिवसाढवळ्या चोरट्यांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे. गणंजय सोसायटीजवळ दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली झाली आहे.
याप्रकरणी माणिक दीक्षित यांनी फिर्याद दिली आहे. माणिक दीक्षित गणंजय सोसायटीमध्ये राहणा-या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी तेथे गेल्या होत्या. यावेळी हातामध्ये सामानाने भरलेली पिशवी घेऊन रस्त्याने पायी जात असताना काळ्या रंगाच्या बाईकवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांना पाहिले. थोड्या अंतरावर पुढे येऊन बाईक उभी केली. यू-टर्न घेऊन पुन्हा त्यांच्या दिशेने गेलेल्या चोरट्यांनी गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि पळ काढला. काही कळायच्या आतच हे चोरटे पसार झाले.
कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले असून त्यावरुन आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.
https://www.dailymotion.com/video/x844oqq