शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा धर्मनिरपेक्ष -आशा पारेख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 4:04 AM

आज आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना तीन-चार दशके आधी यायचे, तसे अडथळे फारसे येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात व्यक्त केले.

पुणे : आज आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करताना तीन-चार दशके आधी यायचे, तसे अडथळे फारसे येत नाहीत. सध्याचा भारत हा पूर्वीपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या समारोप सत्रात व्यक्त केले. या वेळी ‘द हिट गर्ल’ या त्यांच्या आत्मचरित्राचे सहलेखक खालिद मंहोमद आणि प्रकाशक अजय मागो, संमेलनाच्या प्रणेत्या डॉ. मंजिरी प्रभू आदी उपस्थित होते.आत्मचरित्राविषयी पारेख म्हणाल्या की, मी आजवर केवळ अभिनेत्री म्हणून सर्वांना माहिती आहे; मात्र त्या व्यतिरिक्त इतरही खूप काही मी आयुष्यात केले. ते सर्व लोकांसमोर यावे, या हेतूनेच आत्मचरित्र लिहिण्याचे माझ्या मनात आले. एक अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त मी एक चित्रपट वितरण कंपनीदेखील चालविली आहे. सिनेआर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले आहे. सेन्सॉर बोर्डावर काम केले आहे आणि सर्वसामान्यांना परवडेल असे हॉस्पिटलदेखील चालविले आहे. माझ्या आयुष्यातील सर्व पैलू यानिमित्ताने वाचकांसमोर आले आहेत, याचा मला आनंद आहे़आपल्या आवडीचा सहकलाकार कोणता, या प्रश्नावर त्यांनी शम्मी कपूर असे उत्तर दिले. ते माझ्या पहिल्या चित्रपटाचे हीरो होते आणि त्यांनी माझी कायमच काळजी घेतली. मी त्यांना गंमतीने कायमच चाचा म्हणायचे, ते त्यांनी नेहमीच खेळकर वृत्तीने घेतले. या वेळी दिलीप कुमार यांच्या बरोबर झालेल्या गैरसमजामुळे इतक्या मोठ्या प्रथितयश कलाकारा बरोबर काम करता आले नाही याचे दु:ख मनात कायम राहील, असे त्यांनी सांगितले.पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये गेल्या तीन दिवसांत दिग्गज कलाकार आणि लेखकांनी हजेरी लावली व विविध विषयांवर आपली मते मांडली. यंदा ‘व्हॉइस आॅफ वूमेन’ ही संकल्पना असल्याने या विषयी झालेल्या चर्चा खूप रंगल्या.पुण्याशी माझे विशेष नातेपुण्याशी माझे विशेष नाते आहे. माझी आई फर्ग्युसन महाविद्यालयात शिकायची, त्यामुळे वडील तिला भेटायला पुण्यात येत. त्यांनी तिला पुण्यातच लग्नासाठी मागणी घातली त्यानंतर १९४० मध्ये त्यांचे लग्न झाले. मी एफटीआयआयमध्ये शिकू शकले नाही, ही सल नेहमीच माझ्या मनात राहील. खरेतर मी असे मानते की, अभिनय हा शिकवता येत नाही, तो अंगभूत असावा लागतो; मात्र एफटीआयआयने आपल्या चित्रपटसृष्टीला खूप चांगले कलाकार आणि तंत्रज्ञ दिले. खरेतर मी एफटीआयआयची स्थापना होण्याआधीच चित्रपटसृष्टीत आले. लहान वयातच मिळालेल्या रंगभूमीच्या अनुभवामुळे चित्रपटसृष्टीत काम करणे मला सोपे झाले.

टॅग्स :Indiaभारत