दक्षिण पुणो होणार सांस्कृतिक नगरी
By Admin | Updated: September 1, 2014 23:37 IST2014-09-01T23:37:29+5:302014-09-01T23:37:29+5:30
महापालिकेचे सभागृहनेते सुभाष जगताप यांच्या अथक प्रयत्नांतून दक्षिण पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पद्मावती येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह साकारले आहे.

दक्षिण पुणो होणार सांस्कृतिक नगरी
पुणो : महापालिकेचे सभागृहनेते सुभाष जगताप यांच्या अथक प्रयत्नांतून दक्षिण पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पद्मावती येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह साकारले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून असलेली रसिक व कलाकारांची मागणी फलद्रूप झाली आहे. कलारसिकांकडून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने हाउसफुल्लचे फलक सभागृहाबाहेर दिसत आहेत.
शहराचा चारही दिशांनी वेगाने विकास होत आहे. दक्षिण पुणो म्हणून ओळख असलेल्या सहकारनगर, चव्हाणनगर, बिबवेववाडी, बालाजीनगर, धनकवडी, पद्मावती, मार्केटयार्ड व कात्रज परिसरात लाखोंच्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. शिवाय, मध्यवर्ती शहरातील विविध पेठेतूनही नागरिक सहकारनगर व बिबवेवाडी या भागात रहिवासासाठी आले आहेत. त्यामध्ये नाटय़ रसिकांची संख्या मोठी आहे. मात्र, दक्षिण भागात राहणा:या नाटय़ रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवासाठी बालगंधर्व, एस.एम. जोशी, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह या दुस:या टोकाला असलेल्या नाटय़गृहात जावे लागत होते. त्यामुळे नागरिक व कलाकार मंडळींनी दक्षिण पुण्यात सांस्कृतिक केंद्र व नाटय़गृह उभारण्याच्या मागणीसाठी अनेकदा पाठपुरावा केला.
दरम्यान, 2क्क्2मध्ये स्थायी समिती अध्यक्ष असताना सुभाष जगताप यांनी रसिकांची मागणी सत्यात उतरविण्यासाठी पद्मावती येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक व सांस्कृतिक नाटय़गृह उभारण्याची योजना मांडली. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून घेतली. या भागात राहणारे कलारसिक, कलाकार व निर्माते यांनी जगताप यांच्या कामांना साथ दिली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून सुभाष जगताप यांनी शहरातील अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधांयुक्त सांस्कृतिक नाटय़गृह उभारले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन झाले. अजित पवार यांच्यासह रसिक व कलाकारांनीही अत्याधुनिक नाटय़गृहाच्या उभारणीबद्दल कौतुक केले. अभिनेते नाना पाटेकर यांनी या नाटय़गृहाची महती ऐकून आवर्जून भेट देण्याची इच्छा प्रकट केली आहे. मोकळ्या जागेतील या देखण्या नाटय़गृहामुळे दक्षिण उपनगरातील प्रेक्षकांची व कलाकरांची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान नागरिक व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
नाटय़गृहाची वैशिष्टय़े
4सुमारे 86क् प्रेक्षकांची एकावेळी व्यवस्था
4अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक, सुशोभीकरण
4 भव्य कलादान व विद्युतरोषणाई
4 अभ्यासिका, कँटीन व व्हीआयपी कक्ष
4 भव्य व प्रशस्त वाहनतळ
हाउसफुल्लचे फलक
4दक्षिण पुण्यात नव्याने सुरू झालेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक नाटय़गृहात दिवसातून तिन्ही वेळात कार्यक्रम होत आहेत. या भागातील रसिकांची भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने नाटय़गृहाबाहेर हाुसफुल्लचे फलक झळकत आहेत.
स्वारगेट ते कात्रजर्पयत एकही सांस्कृतिक व नाटय़गृह नव्हते. त्यामुळे रसिक व कलाकारांनी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी केली, त्या वेळी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तातडीने नाटय़गृहासाठी तरतूद करून ते साकारण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून समाधान वाटते.
- सुभाष जगताप, सभागृहनेते
अनेक वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रम व नाटके पाहण्यासाठी वाहतूककोंडीतून मार्ग काढत कोथरूड अथवा शिवाजीनगरला जावे लागत होते; परंतु पद्मावती येथे नव्याने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह व सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळेच रसिक व नाटय़प्रेमींकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
- सतीश कुलकर्णी, रसिक, बिबवेवाडी.