पुरंदर मध्ये जागतिक अपंग दिनाला सांस्कृतिक कार्यक्रमांचा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST2020-12-05T04:17:19+5:302020-12-05T04:17:19+5:30

सासवड येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने जागतिक अपंग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप ...

Cultural events on World Disability Day in Purandar | पुरंदर मध्ये जागतिक अपंग दिनाला सांस्कृतिक कार्यक्रमांचा साज

पुरंदर मध्ये जागतिक अपंग दिनाला सांस्कृतिक कार्यक्रमांचा साज

सासवड येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने जागतिक अपंग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप आणि जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली. दिव्यांगांनी संपूर्ण बाजारपेठेतून मशाल फेरी काढली. यावेळी विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे हे होते. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, सासवड एसटी आगार प्रमुख मनीषा इनामके, येवले उद्योग समूहाचे नवनाथ येवले, माजी नगरसेवक प्रवीण पवार, नंदकुमार जगताप, एस टी आगार डेपोचे कैलास जगताप, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश मुळीक, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, राहुल शिंदे, सिकंदर नदाफ, शशांक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना व्हील चेअर प्रदान करण्यात आल्या. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अपंग समिती सदस्य संभाजी महामुनी यांनी केले तर शिवाजी शिंदे यांनी आभार मानलेकार्यक्रमाचे आयोजन प्रहारच्या महीलाध्यक्षा सुरेखा ढवळे, संभाजी महामुनी, दत्तात्रय दगडे, संदीप जगताप, निलेश कुदळे, शिवाजी शिंदे, रेखा धुमाळ, रुपाली साबळे, अतुल शिर्के, राणी शिंदे, ज्योती बोरकर, दत्तात्रय निगडे, शैनाज शेख आदींनी केले

--

फोटो ०४ सासवड अपंग दिन

फोटो ओळ ; सासवड ( ता. पुरंदर ) येथे जागतिक अपंग दिन निमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने मशाल फेरी काढली होती. यावेळी सहभागी झालेले अपंग बांधव.

Web Title: Cultural events on World Disability Day in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.