शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus :‘कोरोना’मुळे पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 14:13 IST

पुण्यात कोरोनाचे आठ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

ठळक मुद्देदररोज शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची असते रेलचेलपुणेकरांची नाट्यगृहांकडे पाठ : देशाबाहेरील नाट्यप्रयोगांचे दौरेही रद्द

पुणे : पुण्यात कोरोनाने प्रवेश केल्याचा धसका सांस्कृतिक विश्वानेदेखील घेतला आहे. काही संयोजकांनी आपले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले असून, देशाबाहेर होणारे नाटकांचे दौरेदेखील रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांकडेदेखील पुणेकर पाठ फिरवू लागले आहेत.पुणे ही सांस्कृतिक राजधानी मानली जात असल्याने दररोज शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, पुण्यात कोरोनाचे आठ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्हा प्रशासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून शक्यतो जाहीर कार्यक्रम घेणे टाळावे, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, आयोजकांनीही आपले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. येत्या १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण पुरस्कार वितरण समारंभ आणि कविसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, ‘कोरानाच्या पुण्यावरील प्रेमा’मुळे यशवतंराव चव्हाण पुरस्कार वितरण समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल, असे ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, संजय ढेरे आणि सचिन जाधव यांनी सांगितले. 

नाटकांच्या तिकीटविक्रीवर विपरीत परिणाम 1 नाट्यनिर्मात्यांनी अद्यापही प्रयोग लावणे बंद केलेले नसले, तरी नाटकांच्या तिकीटविक्रीवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. नाटकांकडेही रसिक  फिरकत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाºयांकडून लेखी आदेश आल्यास कार्यक्रम रद्द करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. २ नाटकांच्या देशाबाहेरील दौºयांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा प्रयोग अमेरिकेमध्ये होणार होता. मात्र, हा प्रयोग रद्द करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले आहे.   महाराष्ट्र साहित्य परिषदेनेही कोरोनाच्या सावटामुळे परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. तसेच, मसापतर्फे सातारा येथे दि. १५ मार्च रोजी होणारे युवा साहित्य नाट्य संमेलनही तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. तरीही, शहरातील काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र, पुणेकरांनी कोरोनाची धास्ती घेतल्यामुळे कार्यक्रमांना रसिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.......... 

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcultureसांस्कृतिकTheatreनाटक