शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

काकडी, हिरवी मिरची महागली; कोथिंबीर स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:46 AM

गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे काकडी आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली.

पुणे : गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे काकडी आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली. परिणामी कांद्याच्या दरात किलोमागे ५ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे बाजारात कोथिंबीरची आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर घसरले आहेत.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात सुमारे १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. त्यात परराज्यातून दिल्लीहून १० ट्रक गाजर, कर्नाटकातून ३ ते ४ ट्रक कोबी, बँगलोरहून ८०० पोती आलं, जयपुर १० आणि मध्यप्रदेश येथून ८ ट्रक मटारची आणि कर्नाटक येथून पाच पोती तोतापुरी कैरीची आवक झाली. स्थानिक मालामध्ये सातारी आल्याची १ हजार २०० पोती आणि टोमॅटोची ५.५ ते ६ हजार पेटी, हिरव्या मिरचीची ३ ते ४ टेम्पो, ढोबळ्या मिरचीची ३ ते ४ टेम्पो, शेवग्याची ३ ते ४ टेम्पो, भुईमुग शेंगाची २०० ते २५० पोती, मटारची ३० ते ४० पोती, पावट्याची ५ ते ६ ट्रक, कांद्याची १७५ ट्रक, इंदौर आणि तळेगाव बटाटयाची ७० ट्रक तर मध्यप्रदेश येथून लसणाची ६ ट्रक आवक झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.दरम्यान, गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात कोथिंबीरीची आवक वाढली आहे. त्यामुळे मागील आठवड्याचा विचार करता कोथिंंबीरीच्या दरात शेकड्यामागे दोनशे रुपयांची घट झाली आहे. कोथिंबीरीबरोबरच मुळे आणि हरबरा गड्डीच्या दरातही घट झाली आहे. त्याचबरोबर चाकवत, करडई, हरभरा गड्डी आणि मुळ्यामध्ये ५ ते १० टक्क्यांनी दरघट झाली आहे. बाजारात मेथीची आवकही कमी झाली असून तर शेपुच्या दरात शंभर रुपयांनी वाढ झाली असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.>गुलछडी, झेंडू महागलागेल्या काही दिवसांपासून थंडी पुन्हा वाढल्याने त्याचा परिणाम गुलछडीच्या फुलांवर झाला आहे. बाजारात गुलछडीच्या फुलांची आवक निम्म्याने घटली असून आवक घटल्याने दरात तब्बल ४० ते ५० टक्कयांनी वाढ झाली आहे. तर झेंडूचे दर ५ ते १० टक्कयांनी वाढले आहेत. मार्केट यार्डातील फुलबाजारात सर्व फुलांची चांगली आवक झाली. परंतु, मागणी कमी असल्याने फुलांचे दर स्थिर आहेत. थंडी वाढल्यास गुलछडीच्या फुलांची अपेक्षित वाढ होत नाही. त्यामुळे आवक घटून दरात वाढ होत आहे.> बोरं स्वस्त; डाळींब, पेरू महागलेपुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात कलिंगडाची आवक वाढली आहे. परंतु, कलिंगडाचा दर्जा खालावलेला असल्याने त्याला अजूनही अपेक्षित मागणी नाही. तर डाळिंबाची आवक वाढली असून मागणीही वाढली आहे.त्यामुळे चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. बोरांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून ग्राहकांकडून मागणी कामी होऊ लागली आहे. त्यामुळे बोरांच्या दरातही ५ ते १० टक्क्यांनी घट झाली आहे.दरम्यान, रायपुर येथून पेरुची आवक सुरु झाली असून या पेरुला जास्त मागणी आहे. बाजारात तब्बल दोन टन पेरुची आवक झाली असून पंधरा किलोच्या बॉक्समध्ये पेरु बाजारात दाखल झालेले आहेत.मात्र, लिंबासह इतर फळांचे दर आवाक्यात आहेत, असे व्यापाºयांनी सांगितले.रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात अननसाची ६ ट्रक, जुन्या मोसंबीची १६ टन तर नवीन मोसंबीची ३० टन आणि संत्रीची १५ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई १५ ते २० टेम्पोे आवक झाली. त्याचप्रमाणे लिंबाची ७ ते ८ हजार गोणी, चिक्कू १० टन, पेरुची दोन टन, रायपुर पेरुची दोन टन, रामफळची ३ टन, खरबुजाची चार टन, कलिंगडाची दहा टन, द्राक्षांची दहा ते बारा टन, गावरान अंजिरची एक टन, स्ट्रॉबेरीची सहा टन, बोरांची दीडशे पोती आवक झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

टॅग्स :vegetableभाज्या