शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भर दुपारी '' या '' मतदान केंद्रावर होती गर्दी कारण.... ऐकून व्हाल चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 12:20 IST

वडारवाडीतील मतदान केंद्रांवर तर सकाळी अगदी शुकशुकाट होताना पण मतदानाची वेळ संपताना प्रचंड गर्दी झालेली आजवरच्या लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकांमधून दिसून आले़. .

ठळक मुद्देवडारवाडी येथील संत रामदास विद्यालयात नेहमी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान

पुणे : सकाळी ७ वाजता मतदान सुरु होते, तेव्हा सकाळी फिरायला तसेच कामाला जाणारे मतदान केंद्रावर येऊन मतदान करुन जातात़. त्यामुळे पहिल्या दोन तासात अनेक ठिकाणी गर्दी झालेली दिसते़. ही गर्दी साधारण ११ वाजेपर्यंत होत असते़.जस जसे उन्ह वाढत जाते तसा मतदानाचा टक्का कमी होत जातो़. त्यानंतर सायंकाळी ४ वाजल्यापासून पुन्हा शेवटच्या दोन तासात गर्दी होताना दिसते़ . ही परिस्थिती सर्वसाधारणपणे सर्व शहरी भागात दिसून येते़. वडारवाडीतील मतदान केंद्रांवर तर सकाळी अगदी शुकशुकाट होताना पण मतदानाची वेळ संपताना प्रचंड गर्दी झालेली आजवरच्या लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकांमधून दिसून आले़. मात्र, यंदा मात्र तेथे नेमके उलट चित्र दिसून आले़. वडारवाडी येथील संत रामदास विद्यालयात नेहमी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान होत असते़. येथे एका इमारतीत पाचहून अधिक मतदान केंद्रे असल्याने येथे जादा बंदोबस्त देण्यात आला होता़. इतर ठिकाणापेक्षा येथे सकाळी थोडे संथपणे मतदानाला सुरुवात झाली़. सकाळी ११ वाजल्यानंतर अन्य ठिकाणी मतदानाचा वेग कमी होत असताना येथे मात्र, सकाळी ११ वाजल्यानंतर गर्दी वाढू लागली़. दुपारी १२ वाजल्यानंतर उन्ह वाढले तशी येथील मतदान केंद्रावरील गर्दी वाढू लागली़. दुपारी १ ते ३ दरम्यान तर येथे मोठी गर्दी झाली होती़. त्यामुळे मतदान  केंद्रांवरील कर्मचारीही भर दुपारी झालेली ही गर्दी पाहून आश्चर्यचकित झाले होते़. या ठिकाणी दुपारी १ ते ३ यावेळेत सर्वाधिक मतदान झालेले दिसून येत होते़. जेथे रात्री उशिरापर्यंत मतदान होत होते़. तेथे सायंकाळी ६ वाजता मतदान संपले होते़. त्याबाबत लोकांना विचारले असता महिलांनी सांगितलेले कारण ऐकून मतदान केंद्रावरील कर्मचारीही चकीत झाले़. या महिलांनी सांगितले की अहो, आमच्या भागात दुपारी साडेतीन नंतर पाणी येते़. त्यानंतर घरातील कामे करायची असल्याने आम्ही सायंकाळी येण्याऐवजी अगोदरच मतदानाला आलो आहोत़. उन्हाळ्यात कमी व मर्यादित प्रमाणात होणाऱ्या पाणी पुरवठाच्या वेळानुसार लोकांनी आपली कामे जुळवून घेतल्याचे हे उदाहरण मतदानाच्या निमित्ताने पुढे आले़. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानWaterपाणी