डोनवत लेकला होतेय पर्यटकांची गर्दी
By Admin | Updated: August 5, 2014 00:13 IST2014-08-05T00:13:42+5:302014-08-05T00:13:42+5:30
खालापूर तालुक्यातील डोनवत धरण सध्या पर्यटकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.

डोनवत लेकला होतेय पर्यटकांची गर्दी
अमोल पाटील - खालापूर
खालापूर तालुक्यातील डोनवत धरण सध्या पर्यटकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. पेण- खोपोली रस्त्यावरचे सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून डोनवत ओळखले जाते. वीकेंडला शेकडो पर्यटक हमखास डोनवत लेकला भेट देतात .
रायगड जिल्हय़ाला पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र नदी नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत . त्यातच खोपोली - पेण राज्य मार्गावर असणारे डोनवत धरण मुसळधार पडणा:या पावसात ओसंडून वाहत आहे. दरवर्षी जुलैच्या सुरुवातीला भरणारे धरण यंदा मात्र जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात पूर्ण क्षमतेने भरले आहे .
डोनवत धरणाला अलीकडे काही वर्षात पर्यटकांनी डोक्यावर घेतल्याने धरण चर्चेत आले आहे . निसर्गाच्या कुशीतून वाहत येणारे पाणी थेट धरणात साठत असल्याने अथांग असे नयनरम्य दृश्य या ठिकाणी पर्यटकांना पाहायला मिळत असते. धरणातील पाणी बाहेर पडत असल्याने त्यातून तयार होणारे लहान लहान धबधबे आणि पाण्याचे तुषार यामध्ये पर्यटक भिजण्याचा आनंद घेत असतो. शनिवार -रविवार मुंबई पुण्यातील शेकडो पर्यटक तर जिल्ह्यातील पर्यटक डोनवत धरणाला आवर्जून भेट देत असतात. हे ठिकाण पर्यटनासाठी सुरक्षित असले तरी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणोने सुरक्षेकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जायचे कसे?
मुंबईहून येणारे पर्यटक खालापूर टोल प्लाझानंतर खोपोली एक्ङिाटचा वापर करून पुढे पेण खोपोली राज्य मार्गावरून या ठिकाणी पोहचू शकतात. पुणोहून खोपोलीला आल्यानंतर अवघ्या दहा किलोमीटर तर पेण शहरापासून 21 किमी अंतरावर डोनवत गाव आहे . गावाच्या अगदी शेजारी ठाकूरवाडीकडे जाणा:या रस्त्यावर हे धरण आहे. राज्य मार्गावरून सुद्धा धरण पाहता येते. येणा:या पर्यटकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किगची सोय आहे
धोका
तलावाच्या पाण्यात पोहण्यावर पाटबंधारे विभागाने बंदी घातली आहे. मात्र काही अंतरावर पोहण्यास मुभा आहे. या पूर्वी पोहता न येणारे पर्यटक बुडाल्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाकडे यासाठी काहीही साधने उपलब्ध नाही.