विद्यार्थ्यांची मासिक पासासाठी गर्दी

By Admin | Updated: November 18, 2016 05:59 IST2016-11-18T05:59:22+5:302016-11-18T05:59:22+5:30

दिवाळीच्या सुट्या संपल्याने विद्यार्थ्यांनी नवीन पास काढण्यासाठी बस स्थानकात गर्दी केली होती. मात्र, सुटे पैसे नसल्याने शालेय विद्यार्थ्यांनाही

The crowd of students for the monthly dice | विद्यार्थ्यांची मासिक पासासाठी गर्दी

विद्यार्थ्यांची मासिक पासासाठी गर्दी

वालचंदनगर : दिवाळीच्या सुट्या संपल्याने विद्यार्थ्यांनी नवीन पास काढण्यासाठी बस स्थानकात गर्दी केली होती. मात्र, सुटे पैसे नसल्याने शालेय विद्यार्थ्यांनाही फटका बसल्याचे दिसत आहे. शासनाने शालेय विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.
वालचंदनगर येथे उत्तम व चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळते म्हणून अनेक गावांतील हजारो विद्यार्थी दररोज येतात. दिवाळी सुटीनिमित्त या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पासची तारीख संपली आहे. नवीन पास काढण्याच्या तयारीत असतानाच नोटा बंद झाल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.

Web Title: The crowd of students for the monthly dice