संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे गणेशभक्तांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:16+5:302021-02-05T05:06:16+5:30
सकाळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. या वेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ...

संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे गणेशभक्तांची गर्दी
सकाळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. या वेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव जितेंद्र बिडवई, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, प्रभाकर गडदे, जयवंत डोके, भगवान हांडे व कर्मचारी तसेच गणेशभक्त उपस्थित होते. श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरिता गर्दीचे नियोजन देवस्थानच्या वतीने केले होते. सोशल डिस्टसिंग पालन, मास्क वापर व सॅनिटायझर वापर बंधनकारक करण्यात आले होते. देवस्थानचे वतीने दर्शनमार्गावर सॅनिटायझर स्टॅन्ड उभारण्यात आले होते. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली.
लेण्याद्री येथे गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.