श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:13 IST2021-01-03T04:13:22+5:302021-01-03T04:13:22+5:30

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय ढेकणे व विश्वस्त जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा ...

Crowd of devotees at Shri Kshetra Lenyadri | श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांची गर्दी

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय ढेकणे व विश्वस्त जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली.

यावेळी देवस्थानचे खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, गोविंद मेहेर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्रशेठ शेटे, प्रभाकर गडदे, सदाशिव ताम्हाणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक भक्त उपस्थित होते. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दुपारी महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. भाविकांचे सुरक्षेसाठी सोशल डिस्टसिंग पालन, मास्क वापर व सॅनीटायझर वापर बंधनकारक करण्यात आले होते. देवस्थानचे वतीने दर्शनमार्गावर सॅनीटायझर स्टॅन्ड उभारण्यात आले होते. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते.

Web Title: Crowd of devotees at Shri Kshetra Lenyadri