शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अलंकापुरीत भाविकांची ‘श्रीं’च्या दर्शनास गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 01:01 IST

आळंदी येथील माऊली मंदिरात षट्तिला एकादशीदिनी राज्यातील लाखावर भाविकांनी गर्दी करून ‘श्रीं’चे दर्शन घेतले.

आळंदी  - येथील माऊली मंदिरात षट्तिला एकादशीदिनी राज्यातील लाखावर भाविकांनी गर्दी करून ‘श्रीं’चे दर्शन घेतले. इंद्रायणी नदीवरील भक्तीसोपान पुलावर दर्शनबारी गेल्याने भाविकांची निवारा व इतर पुरेशा सुविधांअभावी गैरसोय झाल्याने येथील दर्शनबारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात नव्याने विकसित केलेली दर्शनबारी भाविकांच्या गर्दीने भरल्याने दर्शनबारीची रांग पुढे इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावर आली. मंदिराच्या दर्शनबारीलगत भाविकांची दर्शनास गर्दी झाली. मात्र त्या भागातील अरुंद रस्ते, तसेच मंदिर परिक्रमा मार्गाचा प्रशस्त नसल्याने रहदारीला गैरसोयीचे ठरले. यामुळे येथील प्रभावी दर्शनबारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊन, वारा, थंडीचा गारठा सहन करीत भाविकांना श्रींच्या दर्शनबारीतून दर्शनास यावे लागले. यामुळे अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली.षट्तिला एकादशीदिनी आळंदी मंदिर परिसरासह इंद्रायणी नदीघाटाच्या दुतर्फा, प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणेस भाविकांनी गर्दी केली. परंपरेने मंदिरातील धार्मिक उपक्रम विधी, देवदर्शनास श्रींचा गाभारा खुला ठेवण्यात आला होता. मंदिरात एकादशीदिनी लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी मंदिरातील सेवक, सुरक्षारक्षक, बंदोबस्तावरील पोलीस यांनी काम पाहिले.

टॅग्स :AlandiआळंदीPuneपुणे