शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतल्या भाजपा अधिवेशनाला गाड्या आणल्याच पाहिजेत, गिरीश बापट यांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:43 IST

पुणे : मुंबईत ६ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात पुण्यातून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजप शहर शाखेचे जोरदार नियोजन सुरू आहे. महापौर निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत पक्षाचे आमदार व खासदार यांच्यात तूतूमैमै झाले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी मात्र सर्वांनाच कार्यकर्त्यांसहीत किमान ५ मोठ्या गाड्या तरी आणल्या पाहिजे अशी तंबी दिली. या बैठकीला ...

ठळक मुद्देमहापौर निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत पक्षाचे खासदार,आमदार व नगरसेवकांत तूतूमैमैअडचणी असतील तर त्या दूर करू, मात्र, जबाबदारी घ्यावीच लागेल

पुणे : मुंबईत ६ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात पुण्यातून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजप शहर शाखेचे जोरदार नियोजन सुरू आहे. महापौर निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत पक्षाचे आमदार व खासदार यांच्यात तूतूमैमै झाले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी मात्र सर्वांनाच कार्यकर्त्यांसहीत किमान ५ मोठ्या गाड्या तरी आणल्या पाहिजे अशी तंबी दिली. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी तसेच महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक तसेच सर्व समित्यांचे मावळते सभापती, नगरसेवक व पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले बैठकीला उपस्थित होते. मुंबईपासून पुणे जवळ आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. पुण्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकानेच यात सहयोग दिला पाहिजे. पक्षाने तुम्हाला भरपूर दिले आहे, आता तुम्ही पक्षाला द्या, प्रत्येकाने किमान ५ व कितीही मोठ्या गाड्यांसहित कार्यकर्ते घेऊन अधिवेशनाला आले पाहिजे असे बापट यांनी सांगितले.त्यावरूनच ठिणगी पडली. एका आमदारांनी नगरसेवक पालिकेत काय करतात त्याकडे आम्ही कधीतरी लक्ष देतो का, मग आता त्यांच्यावरच मोठी जबाबदारी द्यावी असे सुचवले. त्यामुळे काही नगरसेवकांनी राग व्यक्त केला. आमदार काय करतात ते आम्हाला माहिती नाही का असे ते म्हणाले. बापट यांनी यात मध्यस्थी करताना पक्षाच्या यावर्षी मुंबईत होणाºया अधिवेशनाकडे विरोधकांसहीत जनतेचेही लक्ष आहे. तिथे उच्चांकी गर्दी करण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. त्यात आपल्याला सहयोग द्यायचा आहे. आपण स्वत: २५ गाड्या नेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी गाड्या आणल्याच पाहिेजे, पुण्याची गर्दी तिथे सर्वात जास्त दिसली पाहिजे असे सांगितले.खासदार शिरोळे यांनी बैठकीत सर्वात शेवटी वेगळाच सुरू लावला. बैठकीला किमान ३० पेक्षा जास्त नगरसेवक उपस्थित नाहीत. सहयोगी खासदार असलेले संजय काकडे नाही? असे का असा प्रश्न त्यांनी विचारला. ते का आले नाहीत, त्याची कारणे काय याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला पाहिेजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे ते म्हणाले. उपस्थित नगरसेवकांपैकी काहींनी ५ मोठ्या गाड्या आणणे कसे शक्य आहे अशी विचारणा केली. शाळांच्या परीक्षा सुरू आहे. इतक्या मोठ्या संख्येने तिकडे येण्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध होणार नाही अशी कारणे दिली. त्यावर कारणे सांगू नका, अडचणी असतील तर त्या दूर करू, मात्र, जबाबदारी घ्यावीच लागेल असे बापट व गोगावले यांनी बजावले. त्यानंतर आमदारांची स्वतंत्रपणे बैठक घेण्यात आली.     

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटanil shiroleअनिल शिरोळेMukta Tilakमुक्ता टिळकAmit Shahअमित शाह