कामधंदा सोडून नोटा बदलण्यासाठी गर्दी
By Admin | Updated: November 17, 2016 01:17 IST2016-11-17T01:17:25+5:302016-11-17T01:17:25+5:30
धांदल, धावपळ आणि कामधंदा सोडून पाबळ व शिक्रापूर येथील नॅशनलाइज बँकांमध्ये रोज सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सातवाजेपर्यंत

कामधंदा सोडून नोटा बदलण्यासाठी गर्दी
शिक्रापूर : धांदल, धावपळ आणि कामधंदा सोडून पाबळ व शिक्रापूर येथील नॅशनलाइज बँकांमध्ये रोज सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सातवाजेपर्यंत सुट्टे पैशाबरोबरच ५०० व १००० च्या नोटा भरण्यासाठी परिसरातील गावातील शेतकरी व नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.
मुखई, धामारी, जातेगाव, कान्हूूर मेसाई, हिवरे, पिंपळे, खैरेनगर, खैरेवाडी या मोठ्या गावांबरोबरच येथील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांनी सध्या पाबळ व शिक्रापूर येथे आपला रोजचचा मोर्चा वळवला असून, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोटा स्वीकारण्यास बंदी झाल्यामुळे ही धावपळ वाढली आहे.