शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार किलोमीटरच्या सायकल प्रवासाने गाठणार वाघा बॉर्डर; संभाजीराजेंनी दाखवला हिरवा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:34 IST

पुण्यातील दहा तरूणांची मराठा वॉरियर्स टीम पुणे ते वाघा बॉर्डर अशा सायकल मोहिमेवर रवाना झाली. दिल्लीत या तरुणांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदहा तरूणांची मराठा वॉरियर्स टीम पुणे ते वाघा बॉर्डर अशा सायकल मोहिमेवर रवानाखासदार छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर) यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोहिमेस सुरुवातवाघा बॉर्डरला पोहोचल्यावर मराठा इन्फंट्रीतर्फेया वॉरियर्सचा होईल यथोचित सन्मान

पुणे : सीमेवर तैनात राहून अहोरात्र देशासाठी झटणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सायकल वापराचे महत्त्व, आरोग्याला होणारा फायदा या गोष्टी तरूणांना पटवून देण्यासाठी पुण्यातील दहा तरूणांची मराठा वॉरियर्स टीम पुणे ते वाघा बॉर्डर अशा सायकल मोहिमेवर रवाना झाली. दिल्लीत या तरुणांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.खासदार छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर) यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जल्लोषात त्यांनी मोहिमेला झेंडा दाखवला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेविका विनया तापकीर, पुणे मनपा सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शेकापचे नेते प्रविण गायकवाड, राजाभाऊ गोलांडे तसेच सायकलप्रेमी नागरिक उपस्थित होते.संभाजीराजे म्हणाले, ‘वाघा बॉर्डरला पोहोचल्यावर मराठा इन्फंट्रीतर्फेया वॉरियर्सचा यथोचित सन्मान होईल, अशी व्यवस्था झाली आहे. तसेच दिल्लीतही त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.’ हे मराठा वॉरियर्स महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाब अशा चार राज्यातून तब्बल अठरा दिवसांचा दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून वाघा बॉर्डर गाठणार आहेत.सलग अठरा दिवस अथकपणे हा प्रवास करण्यात येणार आहे. या मार्गावर ज्या ज्या शाळा महाविद्यालये आढळतील, त्या सर्व शाळा महाविद्यालयाला भेटी देऊन तरुणांना भारतीय सेनेमध्ये असणारी संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सायकल चालविण्याचे फायदे व चांगल्या आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यापूर्वी या टीममधील अनेक सदस्यांनी विविध साहसी प्रकार व मोहिमा केल्या आहेत. परंतु, सायकल मोहीम करण्याचे सर्वांची पहिलीच वेळ आहे. सायकल वारी करणाऱ्या मराठा वॉरियर्सच्या संघात राम फुगे, निलेश धावडे, प्रज्ञेश मोळक, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, बजरंग मोळक, विजय हरगुडे, संदीप शिंदे, विश्वास काशिद व ८ वर्षीय अंशुमन धावडे असे सदस्य आहेत. 

टॅग्स :PuneपुणेNew Delhiनवी दिल्ली