शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात बांबू शेतीतून होतेय कोट्यवधींची कमाई ; यंदा दोनशे हेक्टर लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 12:10 IST

जोडधंदा म्हणून उत्तम पर्याय 

श्रीकिशन काळेपुणे : पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या तालुक्यांतील बांबू तोड व विक्रीतून दरवर्षी सुमारे १५० कोटी रुपये या भागातील शेतकऱ्यांना मिळत आहेत. तसेच तोड करणारे मजूर आणि वाहतूक करणाऱ्यांना देखील रोजगार मिळत आहे, अशी माहिती बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक डॉ. हेमंत बेडेकर यांनी दिली. बांबू फक्त कापून विकण्याऐवजी त्यापासून विविध वस्तू, हस्तकलेतून वापर वाढविला तर कोट्यवधींची उलाढाल वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच यंदा दोनशे हेक्टर जिल्ह्यात नवीन लागवड झाली आहे.

वन सर्वेक्षणातील अंदाजानुसार सह्याद्रीच्या दोन्ही उतारावरील ८,९ जिल्ह्यात महाराष्ट्राला सुमारे ९०० कोटींचे उत्पन्न मिळते. हे गेली अनेक वर्षे चालू आहे. हे उत्पन्न बांबू तोडून विकण्याने मिळते. याच बांबूचा जर व्यापारी उपयोग केला गेला किंवा काही प्रक्रिया केली गेली, तर हेच उत्पन्न काही हजार कोटींच्या घरात जाईल. दुर्दैवाने याकडे अजून कोणी पाहिले नाही. कोल्हापूर, सांगली, लोणंद, सासवड, पुणे या बाजारात अनेक दशके बांबूचा व्यवहार चालू आहे.राज्यात वाया गेलेल्या जमिनीवर बांबू लावला तर चांगले उत्पन्न होईल. काही शेतकरी एकत्र येऊन बांबूची शेती करून बायो-सीएनजी प्रकल्प टाकू शकतात. याला चांगली मागणी आहे, असे बेडेकर म्हणाले. बांबू लावल्यावर तीन-चार वर्षानंतर कायमस्वरूपी उत्पन्न मिळायला सुरवात होते. डोंगर उतारावर, माळरानावर लावता येते. 

--------------------------...तर राज्यात ५ हजार कोटींपर्यंत उलाढाल बांबूची पीक म्हणून लागवड, निगा व नियोजन केल्यास राज्यातील बांबू व्यापार सुमारे ५००० कोटींपर्यंत जाऊ शकतो. बांबूचे मार्केटिंग व्हायला हवे. तर यापासून चांगला कोळसा, दैनंदिन उपयोगातील ताट-वाटी, चमचे होऊ शकतात. प्लास्टिक ऐवजी हे वापरू शकतो. बांबूच्या वस्तूंचे लगेच विघटन होते. हाँटेलमध्ये पार्सलसाठी बांबूच्या बाँक्सचा वापर झाला पाहिजे. 

------------------------------

नदी प्रदूषणावरही बांबू उपयुक्तकुरकुंभ, शिरवळ, जेजुरी या व इतर ठिकाणी एमआयडीसी आहेत. त्यातील प्रदूषित पाणी थेट नदीत जाते. तेच पाणी एका ठिकाणी जमा करून तिथे बांबू लावला तर त्यातील प्रदूषित घटक बांबू शोषून घेईल आणि पाणी शुद्ध होईल. ते शुद्ध पाणी जमिनीत मुरल्यावर विहिरांना पाणी राहिल. असा उपक्रम राज्यभर व्हायला हवा, असे बेडेकर यांनी सांगितले. 

-------------------------------

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीbusinessव्यवसाय