शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महाराष्ट्रातून कोटी कोटी उड्डाणे; १७ वर्षांत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय-देशी विमान प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:53 IST

गेल्या १७ वर्षांत सर्वाधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवासी आघाडीवर असल्याची माहिती भारतीय विमान प्राधिकरणाने दिली आहे.

ठळक मुद्देदेशांतर्गत प्रवासामध्ये राज्याने प्राप्त केले तब्बल १५ वर्षे अव्वलस्थानदेशात हवाई उड्डाणांच्या बाबतीत दिल्ली आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक झेपावत आहेत विमान

विशाल शिर्केपुणे : देशात गेल्या १७ वर्षांत सर्वाधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवासी आघाडीवर असल्याची माहिती भारतीय विमान प्राधिकरणाने दिली आहे. या कालावधीत देशांतर्गत प्रवासामध्ये राज्याने तब्बल १५ वर्षे अव्वलस्थान, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अकरा वर्षे अव्वलस्थान प्राप्त केले आहे. आता ती जागा देशाची राजधानी दिल्लीने घेतली आहे. देशात हवाई उड्डाणांच्या बाबतीत दिल्ली आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक विमान झेपावत आहेत. तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकातील तफावत ही निम्मी आहे. देशांत २०००-०१मध्ये देशांतर्गत उड्डाणांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७९ लाख ६१ हजार ९६३  प्रवाशांनी विमानसेवेचा वापर केला. त्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीतून ४९ लाख ८४ हजार १५७ प्रवाशांनी विमानसेवा वापरली होती. देशांतर्गत विमानसेवा वापरण्याची महाराष्ट्राची मक्तेदारी २०१५-१६पर्यंत कायम होती. राज्यातून २०१५-१६ मध्ये ३ कोटी ७२ लाख १५ हजार ६४९ प्रवाशांनी प्रवास केला. त्या वर्षी दिल्लीतून ३ कोटी ४२ लाख ७१ हजार ९९३ प्रवाशांनी विमान प्रवास केला. दिल्लीतून २०१६-१७ या वर्षांत ४ कोटी २२ लाख ५ हजार ७१२ प्रवाशांनी विमानसेवेचा वापर करीत राज्याची सर्वाधिक प्रवाशांची मक्तेदारी मोडून काढली. या वर्षी राज्यातून ४ कोटी १५ लाख ५ हजार ९०३ प्रवाशांनी वापर केला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटक राज्यातून २ कोटी ४३ लाख ३३ हजार ३९६ प्रवाशांनी विमानसेवा वापरली आहे. 

देशांतर्गत विमान प्रवासातील अव्वल राज्य

राज्य२००१-०२२००५-०६२०१०-११२०१५-१६२०१६-१७
महाराष्ट्र७९,६१,९६३१,३१,९४,२७८  २,४३,७७,७७६३,७२,१५,६४९४,१५,०५,९०३
दिल्ली४९,८४,१५७१,०४,६८,०२८२,०६,६७,११३३,४२,७१,९९३४,२२,०५,७१२
कर्नाटक२४,८७,८३१५१,३६,१३२ १,००,५१,१३९ १,६७,८०,३१०२,०४,३३,३९६
तमिळनाडू२६,०२,८८६४९,४०,८८१९४,६८,२६०१,२७,२१,७६९१,६१,०१,१००
पश्चिम बंगाल२१,४९,२५३३८,७२,१३५८८,५६,५७० १,१६,६४,१६५१,५०,९४,४९०
आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांतील अव्वल राज्य    
राज्य२००१-०२२००५-०६२०१०-११२०१५-१६२०१६-१७
महाराष्ट्र५१,७४,७१६६७,६७,३४४९१,७५,२०२१,१९,४२,०९०१,२८,१०,३९७
दिल्ली३९,४९,६०३ ५७,६६,६७३९२,७५,७७४१,४१,५२,१७२१,५४,९७,३८४
केरळ१३,५९,२६१ २९,२६,८४४ ६०,३१,१५५ ८८,६७,६२५ ९५,२१,३७४
तमिळनाडू१८,९५,९४४ २७,८१,३६० ५०,१५,४२७६४,१९,३०४६८,०६,८०५
पश्चिम बंगाल६,३१,५५८७,४२,२५० १४,४९,५८७२१,९२,५९६२२,५५,५१५

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र