अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:55+5:302021-01-13T04:25:55+5:30
यावर्षी कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता त्यातच बी टाकल्यावर पावसानेही मोठे नुकसान झाले होते व आता लागवडी केल्यानंतर ...

अवकाळीमुळे पिकांचे नुकसान
यावर्षी कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता त्यातच बी टाकल्यावर पावसानेही मोठे नुकसान झाले होते व आता लागवडी केल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने शेतात पाणी साचून कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा पिकाचे बुरशीजन्य रोगामुळे अगोदरच मर होत होती त्यातच हा अवकाळी पाऊस झाल्याने व रात्रभर कांदा पिकात पाणी साचून राहिल्याने कांद्यावर बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येणार असल्याचे शेतकरी महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
वडगाव कांदळी(ता. जुन्नर) येथील बाबाजी मारुती मुटके या शेतकऱ्याचा २ एकर ऊस अवकाळी पावसाने भुईसपाट झाला आहे. त्यांच्या दहा महिने वयाच्या दोन एकर उसाला ५० हजार रुपये खर्च करून ऊस पीक घेतले होते. परंतु या पावसाने ऊस पीक पूर्णपणे खराब झाले आहे. टोमॅटो बागेत पावसाचे पाणी साचून व बाग पडून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचा कृषी विभागाने ताबडतोब पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी बाबाजी मुटके यांनी केली आहे.
१० बेल्हा