शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

'मॅरेथॉनविषयक युवकांमध्ये सकारात्मकता गरजेची'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 3:03 AM

सर्वस्तरीय सहभागाशिवाय परिपूर्णता नाही; पुणे रनिंगने लोकमत मॅरेथॉनला दिल्या शुभेच्छा

पुणे : मुंबईसारख्या शहरात पार पडणा-या मँरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग दिसून येतो. त्यातुलनेत इतर शहरांमधील प्रतिसाद बघता अद्याप मँरेथॉनविषयी नागरिकांची मानसिकता बदलणे महत्वाचे आहे.स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या युगात स्वत:चे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे आव्हानात्मक असताना सुदृढ स्वास्थ्याकरिता उपलब्ध असणा-या पर्यायांचा विचार करुन त्यात सहभागी होणे गरजेचे आहे. मँरेथॉनबाबत मोठ्या प्रमाणात सकारात्मता तयार झाल्यास त्याचा फायदा सर्वांना होईल. असे मत ‘पुणे रनिंग’च्या पदाधिका-यांनी व्यक्त केले.‘पुणे रनिंग’ने लोकमत महामँरेथॉनला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पुणे रनिंगचे संचालक संदीप कोल्हटकर, प्रीती आरवडे, राकेश मेहता, नवीन सिंग आदी उपस्थित होते. लोकमतचे संपादक प्रशांत दिक्षीत यांनी त्यांचे स्वागत केले. मँरेथॉन आणि त्याबद्द्लच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मान्यवरांनी पुणे शहरातील गेल्या काही वर्षांपासून सुरु झालेले मँरेथॉन कल्चर त्यातुलनेने देशातील इतर शहरांमधील मोठ्या प्रतिसादात सुरु असणा-या मँरेथॉन याकडे लक्ष वेधले. कोल्हटकर म्हणाले, मँरेथॉनमध्ये प्रामुख्याने धावणारा वयोगट २० च्या पुढचा आहे. पुण्यात व उपनगरांमध्ये काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उत्साहाने मँरेथॉन पार पडत असून तरुणाईचा त्यात लक्षणीय सहभाग आहे. मात्र तो आणखी गंभीरतापूर्वक वाढावा यासाठी पुरेसे प्रयत्न करणे गरजेचे आहे.व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा म्हणून मँरेथॉनकडे पाहिले जाते. याबद्द्ल आवश्यक ती माहिती, मार्गदर्शन, पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा, खेळाडूंना आकर्षित करणारी पारितोषिके यांचा प्रभावीपणे उपयोग करता येणे महत्वाचे आहे. भविष्यात आपल्याकडे मँरेथॉन नावाची संस्कृती टिकवायची असल्यास त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे लागणार आहे.प्रीती आरवडे म्हणाल्या, इतर स्पर्धांच्या तुलनेने मँरेथॉनकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. इतर क्रीडाप्रकारांकडे ज्या संख्येने तरुणाईची पसंती असते त्यातुलनेने मँरेथॉनला दिसून येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. यापेक्षा आयटी सेक्टरमधील तरुणाईचा कल मँरेथॉनकडे असल्याचे दिसून येत आहे. हे समाधानकारक चित्र म्हणावे लागेल.पुण्यासारख्या शहरात भविष्यात उत्साहाने मँरेथॉन स्पर्धा पार पडणाकरिता माध्यमांबरोबरच नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असणार आहे. कारण मँरेथॉन हा एक टेÑंड बनतो आहे. त्याची लोकप्रियता देखील वाढत आहे.निरोगी आरोग्याकरिता धावणे किती महत्वाचे आहे यासाठी मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे तरुणांमध्ये धावण्याविषयीची जी एकप्रकारची नकारात्मकता आहे ती दूर करुन त्यांना उत्साहाने मँरेथॉनमध्ये सहभागी करुन घेणे आव्हानात्मक असणार आहे. असे मत मेहता यांंनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनPuneपुणे