सराईत गुन्हेगाराने पोलिसांना शिवीगाळ करीत भिरकाविली वीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:11 IST2021-05-07T04:11:49+5:302021-05-07T04:11:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी येथे सराईत गुन्हेगार गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून ...

A criminal in Sarai hurled insults at the police | सराईत गुन्हेगाराने पोलिसांना शिवीगाळ करीत भिरकाविली वीट

सराईत गुन्हेगाराने पोलिसांना शिवीगाळ करीत भिरकाविली वीट

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बिबवेवाडी येथे सराईत गुन्हेगार गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून त्यांच्यावर वीट भिरकाविण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अमोल तानाजी ढावेर (वय २०, रा. जांभुळवाडी, कात्रज) याला अटक केली आहे. तर सनी संतोष भरगुडे (वय २०, रा. बिबवेवाडी) व त्याच्या दोन साथीदारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस कर्मचारी अमोल नवले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ते गोंधळ घालत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नवले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तेथे जावून त्यांना विचारणा केली. त्यावेळी सनि याने त्यांच्या दिशेने वीट भिरकावून फेकली. तसेच ढावरे याने देखील झटापट करून शिवीगाळ केली. त्यानुसार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकणी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली.

Web Title: A criminal in Sarai hurled insults at the police