सराईत गुन्हेगाराने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST2021-01-03T04:12:31+5:302021-01-03T04:12:31+5:30

योगेश देवीदास कांबळे (वय २३) आणि आश्विन भोसले (दोघे रा़ हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुहास अभिमन्यू ...

The criminal gave the young man a cigarette and slapped him on the forehead | सराईत गुन्हेगाराने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका

सराईत गुन्हेगाराने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका

योगेश देवीदास कांबळे (वय २३) आणि आश्विन भोसले (दोघे रा़ हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुहास अभिमन्यू वाघमारे (वय १९, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. योगेश कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सुहास वाघमारे व त्याचा मित्र योगेश निर्मळ हे दुचाकीवरुन शुक्रवारी सकाळी जात होते. त्यावेळी वडगाव येथील रोकडोबा मंदिर येथे योगेश कांबळे याने त्यांना हाक मारुन थांबविले व गाडीच राईड मागितली. तेव्हा वाघमारे याने गाडी देण्यास नकार दिला. तेव्हा योगेश व आश्विन यांनी त्याला शिवीगाळ केली़ योगेश याने सिगारेट पेटवून ती वाघमारे यांच्या कपाळावर चटका देऊन जखमी केले. पोलिसात गेला तर याद राखा अशी धमकी दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Web Title: The criminal gave the young man a cigarette and slapped him on the forehead