पुणे - विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराच्या विविध भागात दोन गटांमध्ये मारामाऱ्या, विसर्जन करायला जाणाºया नागरिकांवर कोयत्याने वार करून जखमी करणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, पोलीस चौकीत गोंधळ घालण्याचे प्रकार घडले. या प्रकरणी कोथरूड, स्वारगेट, वानवडी, मुंढवा, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.कोथरूड पोलीस ठाण्याच्या बाहेर येथे डीजे लावून मिरवणूक काढणाºया मंडळांना आवाज कमी कर म्हणून सांगायला गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालून तुम्ही आमचा मिक्सर काढाच, मग बघून घेतो, असा दम देण्यात आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी गणेश मित्र मंडळ गोल्डन ग्रुुप, मयूर कॉलनीचे अध्यक्ष समीर मोहोळ, प्रज्ञा साउंड सिस्टीमचे मालक श्रीकांत कौदाड यांच्यासह २५ जणांवर गुन्हे दाखल केले. तर, पौड फाटा येथे केळेवाडीतील बाल मित्र मंडळचे अध्यक्ष अमरीश सुभाष शिंदे साउंड सिस्टिमचे मालक सुमित तिकोणे यांच्यासह २५ जणांवर गुन्हे दाखल केले.लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकात श्रीकृष्ण मंडळाला डीजे वाजविण्यास मनाई केल्याने कार्यकºयांनी उपनिरीक्षक प्रवीण भोपळे यांच्या अंगावर धाऊन जावून सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.बी. टी. कवडे रस्त्यावर रिक्षा स्टँड येथे आदिक खंडागळे (वय २५, रा. रामटेकडी) हे कुटुंबीयांसह गणतपी विसर्जनासाठी जात असताना प्रेम याने कोणतेही कारण नसातना डोक्यामध्ये सिमेंटचा ब्लॉक घालून जखमी केले. तर स्वारगेट येथे गणपती मिरवणुकीत झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. ही घटना टिळक रस्त्यावर हिराबाग चौकत घडली.या प्रकरणी हृषीकेश पाटोळे (वय २०, रा. गाडीतळ, हडपसर) याने फिर्याद दिली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोरपडी गावात वर्गणी देण्यावरून वाद झाल्याने नारायण यादव (वय ४५) यांना शिवीगाळ करून बेसबॉलच्या स्टिकने मारहाण करून जखमी केले.पोलीस चौकीत गोंधळशिवाजीनगर पोलीस चौकी येथे वाहतूककोंडी करणाºया मंडळाच्या कार्यकर्त्यांना बाजूला काढल्याचा राग आल्याने ४० ते ४५ जणांनी पोलीस चौकीत घुसून गोंधळ घातला. पोलीस शिपाई अविनाश पुंडे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिरवणुकीत पोलिसांना दमदाटी, मंडळांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:03 IST