शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

महाराष्ट्र बंद दरम्यान तोडफोडप्रकरणी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:21 IST

कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान रॅली काढून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यास लावणा-या, रास्तारोको तसेच दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-यांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान रॅली काढून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यास लावणा-या, रास्तारोको तसेच दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-यांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आंबेडकर पुतळा, ट्रायलक चौक, कॅम्प परिसरातील मोदीखाना भागात विनापरवाना मोर्चा काढत परिसरातील नागरिकांना दुकाने बंद करायला लावले. तसेच रस्त्यावरील वाहनांवर आणि शोरूमवर दगडफेक केली आहे.याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. याबरोबरच जहांगीर हॉस्पिटल चौक, मोबाज चौक आणि ताडीवाला रोड येथे दुपारी पावणे दोनच्या सुमारास परिसरातील लोकांना बळजबरीने दुकान बंद करायला लावत रस्त्यांवरील वाहने आणि शोरूमवर दगडफेक करून ३७ हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.हडपसरमध्ये रविदर्शन बसस्टॉपसमोर सकाळी पावणे अकराला दोन बसचे नुकसान केल्याप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच चंदननगरमध्ये कार्यकर्त्यांनी श्री स्वामी समर्थ हॉटेलमध्ये दुपारी साडेबारा वाजता हॉटेल बंद करायला सांगून शिवीगाळ केली.तसेच पोलिसांना धक्काबुक्की करून परिसरात दगडफेक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.सिंहगड रोड परिसरातील दांडेकर पूल भागात पानमळा परिसरात दोन बसवर दगडफेक केली. तर पावणेअकराला लोकमान्यनगर भागात एकाने बसवर दगडफेक करीत १७ हजारांचे नुकसान केले आहे. पुष्प मंगल कार्यालयाजवळ २ बसवर दगडफेक करत नुकसान केले.दांडेकर पूल परिसरात एका अल्पवयीन मुलाने खासगी बसच्या काचावर दगडफेक करीत नुकसान केले. तसेच या सर्व प्रकरणांमध्ये दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद केली आहे.मार्केट यार्ड बसडेपोसमोर उभ्या असलेल्या बसमधील सीटवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून बसचे ३ हजारांचे नुकसान केले.बिबवेवाडी, कोरेगाव पार्क, लष्कर, दत्तवाडी, स्वारगेट, मार्केट यार्ड, पिंपरी, वाकड, हडपसर आणि चंदननगर पोलीस ठाण्यात सुमारे चारशे जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.च्शहरात बंद दरम्यान शहरातील सोळा ठिकाणी रॅली काढून नागरिकांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास लावले. तसेच रास्तारोको करून खासगी व सरकारी वाहनांवर दगडफेक केली. या पीएमपीएमएल, स्कूल बस व खासगी वाहनांचे नुकसान झाले.चैत्रबन वसाहत आणि अप्पर इंदिरानगर बस डेपो येथे ४ पीएमपी बसेस आणि ३ खाजगी वाहनांवर दगडफेक करण्यात आली.अप्पर डेपो तसेच डॉल्फिन चौक परिसरात रस्ता अडवून एक बस, २ स्कूल बस, एका कारवर दगडफेक करण्यात आली.इंदिरानगर, गुलटेकडी येथे मंगळवारी रात्री दोन बसचे नुकसान केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली़

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगाव