दौंडच्या सराईत गुन्हेगाराला पुण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:17 IST2021-03-13T04:17:06+5:302021-03-13T04:17:06+5:30
पुणे : दरोडा, खुनाचा प्रयत्न, चोऱ्या, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या फरार गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. दत्ता अशोक शिंदे ...

दौंडच्या सराईत गुन्हेगाराला पुण्यात अटक
पुणे : दरोडा, खुनाचा प्रयत्न, चोऱ्या, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या फरार गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. दत्ता अशोक शिंदे (वय २४,रा. राहू, ता. दौंड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
शिंदे याच्यावर भोसरी, दिघी, शिरूर, पिंपरी, बारामती, यवत पोलीस ठाण्यात दरोडा, चोऱ्या, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे असे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. जुलै २०२० पासून शिंदे हा पोलिसांना गुंगारा देत होता.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्तीवर असताना पोलीस कर्मचारी योगेश सुळ व अमोल सोनटक्के यांना शिंदे आनंद दरबार जवळ कात्रज परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढला. परंतू पोलिसांनी पाठलगा करून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला यवत पोलिसांच्या ताब्यात दिले.