आत्महत्येस कारणीभूत पाच जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST2021-08-01T04:10:33+5:302021-08-01T04:10:33+5:30

जेजुरी पोलिसांनी दालेल्या माहितीनुसार पिंगोरी गावच्या हद्दीमध्ये दोन दिवसापूर्वी ज्ञानेश्वर सर्जेराव यादव (वय ५५ वर्षे) यांनीदि. २८ रोजी त्यांच्या ...

Crimes against five people for causing suicide | आत्महत्येस कारणीभूत पाच जणांवर गुन्हे

आत्महत्येस कारणीभूत पाच जणांवर गुन्हे

जेजुरी पोलिसांनी दालेल्या माहितीनुसार पिंगोरी गावच्या हद्दीमध्ये दोन दिवसापूर्वी ज्ञानेश्वर सर्जेराव यादव (वय ५५ वर्षे) यांनीदि. २८ रोजी त्यांच्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करते वेळी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, की सतीश पोपट खोमणे, हनुमंत पोपट कांबळे यांना त्यांनी बारा वर्षांपूर्वी २ लाख रुपये जागा खरेदीसाठी दिले होते. ते आता पैसे परत देत नव्हते व उलट पैसे मागितले तर त्यांच्यावर सावकारी करीन असे दम देत होते. तसेच म्रुत यादव यांच्या मुलाचे सासरे व मेहुणे अशोक नारायण जगताप, सासू जयश्री अशोक जगताप व मुलाची पत्नी ऐश्वर्या ओंकार यादव यांनीसुद्धा त्यांचे घेतलेले पैसे परत दिले नव्हते. तसेच मुला बरोबर ते वारंवार भांडण करत होते व हक्क सोड पत्र करून देण्याबाबत दबाव टाकत होते. या सर्व बाबींना कंटाळून त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. यादव यांचा मुलगा ओंमकार ज्ञानेश्वर यादव (वय २६ वर्षे) याने सुद्धा वरील सर्वां विरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपगार हे करत आहेत.

Web Title: Crimes against five people for causing suicide