शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

..... तर ‘मेट्रो’ वर फौजदारी गुन्हा दाखल करू : राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 8:09 PM

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांना बहुतेक वृक्ष संवर्धन कायद्याची माहिती दिसत नाही. त्यांनी ती करून घ्यावी अन्यथा त्यांच्या विरोधात...

ठळक मुद्देवृक्ष प्राधिकरण समितीचे प्रकरणमहामेट्रो वृक्ष संवर्धन कायद्याचे पालन न करता काम करत असल्याचा आरोप

पुणे : वृक्ष पुनर्रोपणासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीची गरज नाही असे म्हणणारे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना बहुतेक वृक्ष संवर्धन कायद्याची माहिती दिसत नाही. त्यांनी ती करून घ्यावी व मेट्रोचे काम करताना त्या कायद्याचे पालन करावे अन्यथा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा इशारा वृक्ष प्राधिकरण समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या वतीने देण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, समितीच्या सदस्य शिल्पा भोसले, मनोज पाचपुते हे यावेळी उपस्थित होते. मेट्रो मार्गाचे तसेच डेपोचे काम करताना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचे महामेट्रोच्या वतीने पुनर्रोपण करण्यात येत आहे. त्यासाठी वर्षभरापूर्वी मेट्रोने समितीकडे परवानगी मागितली होती. त्यानंतरही तीन प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र,  समितीकडून त्यावर काही निर्णयच झाला नाही. दरम्यानच्या काळात महामेट्रोला त्यांच्या डेपोचे काम करणे गरजेचे असल्याने त्यांनी त्या जागेवरील वृक्षांच्या पुनर्रोपणाचे काम सुरू केले. त्यावर समितीच्या वतीने हरकत घेण्यात आली होती. दिक्षित यांनी त्यावर बोलताना महामेट्रो एकही झाड तोडणार नाही तर त्यांचे पुनर्रोपण करणार आहे , असे सोमवारी सांगितले होते.त्याचाच आधार घेत भोसले यांनी महामेट्रो वृक्ष संवर्धन कायद्याचे पालन न करता काम करत असल्याचा आरोप केला. पुनर्रोपण करणार असाल तर त्यालाही परवानगी लागते, वृक्ष तोडणारच नाही तर त्यासाठी परवानगी मागणारे प्रस्ताव दाखलच का केले, ही पुणेकरांनी फसवणूक आहे असा आरोप भोसले यांनी केला. तुपे म्हणाले,कायद्याचे पालन केले जात नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल. प्रसंगी महामेट्रोवर कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही तुपे यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका