आत्महत्येच्या धमकीप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:11 IST2021-03-14T04:11:59+5:302021-03-14T04:11:59+5:30

दीपक देविदास महाजन (२१, रा. मूळ गाव चौधरी कॉलनी, चिखलठाणा, औरंगाबाद) यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

Crime in a suicide threat case | आत्महत्येच्या धमकीप्रकरणी गुन्हा

आत्महत्येच्या धमकीप्रकरणी गुन्हा

दीपक देविदास महाजन (२१, रा. मूळ गाव चौधरी कॉलनी, चिखलठाणा, औरंगाबाद) यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजी वर्गीस सीयू (४४, रा.खराडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाजन हा पॅराडाइज एल्डर केअर या संस्थेत पूर्वी कामाला होता. महाजन आणि सीयू यांच्यात पगाराबाबत बोलणे सुरू होते. महाजन याने फिर्यादीच्या राहत्या घरातील डी. के. दास यांच्या खोलीत बेकायदेशीर प्रवेश केला. खोलीचा दरवाजा आतून बंद करून दास यांना खोली बाहेर जाण्यास मज्जाव केला. मला जोवर पगार देत नाही, तोवर खोलीचा दरवाजा उघडणार नाही, असे म्हणत सगळीकडे सॅनिटायझर टाकून स्वतःचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली, तसेच शिवीगाळ केली. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता खराडीतील इऑन वॉटर फ्रंट सोसायटीमध्ये घडली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Crime in a suicide threat case