शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातही गुन्हेगारीत वाढ! धायरीत पूर्व वैमनस्यातून तरुणावर तरुणावर कोयत्याने वार करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 16:42 IST

धायरी येथील घटना; एकजण जखमी; पोलिसांनी आरोपीला केली अटक

ठळक मुद्देचार तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या ...

धायरी: पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने कोयता व तलवारीच्या सहाय्याने डोक्याच्या पाठीमागे वार केल्याने त्यात गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. शाम हरिश्चंद्र सोनटक्के (वय:२०, रा.जाधव नगर, धायरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही  घटना बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास जाधव नगर, रायकर मळा धायरी येथे घडली. याबाबत योगेश व्यंकटेश चव्हाण (वय:१९, धायरीगाव, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात ५ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश, शाम व त्यांचे काही मित्र हे रायकरमळा येथील जाधवनगर भागातील ओढ्यालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसणार होते. तसा त्यांचा बेत सुरु होता. दरम्यान, आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वीचे वाद आहेत. ते एकमेकांना ओळखतात. रात्री दारू पिण्याचा बेत सुरू असतानाच आरोपी तेथे आले. त्यांच्या हातात कोयते आणि तलवारी होत्या. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अनिकेत उर्फ मोन्या पोळेकर याने तुम्हाला मस्ती आली आहे का, आज तुम्हाला खपवून टाकतो, तुम्ही खुनशीने पाहता का, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, फिर्यादीवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. तर फिर्यदीचा मित्र शाम याच्यावर दगडाने, तलवारीने तसेच कोयत्याने सपासप वार केले. यात शाम सोनटक्के हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादीच्या बोटाला दुखापत झाली असून तो जखमी झाला. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. गोपनीय खबऱ्यामार्फत तसेच परिसरातील सीसीटिव्ही तपासणी करून आरोपीना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील आरोपी अनिकेत उर्फ मोन्या पोळेकर ( वय:१९, रा. रायकर मळा, धायरी, पुणे) याला अटक केली आहे. तर इतर चार आरोपी हे अल्पवयीन असून पोलीस त्यांची चौकशी करत होते. 

चार तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या ... आरोपी मोन्या पोळेकर याच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात पूर्वी एक गुन्हा दाखल आहे. आरोपी मोन्या पोळेकर व फिर्यादी योगेश चव्हाण तसेच शाम सोनटक्के यांच्यात वाद होता. याआधी त्यांची तू -तू मैं- मैं झाली होती. फिर्यादी मित्रांसमवेत दारू पीत असल्याचे समजल्यानंतर आरोपीने साथीदारासह तिथे जाऊन हल्ला केला. लॉकडाऊन असताना खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली. सिंहगड रस्ता पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून तसेच गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून अवघ्या चार तासांत आरोपींचा शोध घेतला. आरोपी मोन्या पोळेकरला न्यायालयात हजर केले असता १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस