शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सेवाभावी ट्रस्टच्या जागेवर बेकायदा ताबा घेणार्‍या कामशेतमधील दोघांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 15:42 IST

या जागेवर सेवाभावी संस्थेच्या वतीने कॅन्सर निदान केंद्र उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोणावळा : शिलाटणे गावात राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या एका सेवाभावी ट्रस्टच्या  जागेचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न करत तेथील नागरिकांना शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कामशेतमधील दोन जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     जयंतीलाल वेदमुथा व कल्पेश जयंतीलाल वेदमुथा (दोघेही रा. कामशेत, ता.मावळ, जि. पुणे) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिरेन शहा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.    लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलाटणे गावात जमीन गट नं. 164/1 ही जागा इंद्रायणी हेवन्स नवजीवन ग्लोबल हार्ट व हेल्थ सेंटर या विश्वस्त संस्थेचे विश्वस्त सुधा रामचंद्र गायकर यांच्या नावे असून सातबारा उतार्‍यांवर देखील त्यांचे नावे आहे. सदर जागेमध्ये 1996 साली त्यांनी त्या जागेत 20 बाय 40 चे बांधकाम केले आहे. त्याची नोंद देखील त्याच्या नावे असून त्याचा कर ते शिलाटणे ग्रामपंचायतीला भरत आहेत. या जागेवर इंद्रायणी हेवन्स नवजीवन ग्लोबल हार्ट व हेल्थ सेंटर या सेवाभावी संस्थेच्या वतीने कॅन्सर निदान केंद्र उभारण्यात येणार आहे. याकामाला सुरुवात होताच कामशेत येथील जयंतीलाल वेदमुथा यांनी सदरची जागा माझीच असल्याचे सांगत त्याठिकाणी उपचाराकरिता दाखल असलेल्या दोन रुग्णाांना तसेच त्याठिकाणी असलेल्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. तसेच जागेमधील घरावर बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. शहा यांनी केली होती. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर वरील गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस