शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: बदनामीची धमकी देत महिलेने मागितली ५४ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:08 IST

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा प्रकार मुंबई येथे घडला असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई शहर येथील खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे

पिंपरी : हॉटेल व हॉटेलच्या ग्रुपची बदनामी करण्याची धमकी देत महिलेने ५४ लाखांची खंडणी मागितली. ईमेल, मोबाईल टेक्स्ट मेसेज व व्हाटसॲप मेसेज करून मुंबई येथे ४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अनुराग सर्वजीत भटनागर (वय ५६, रा. मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांची आणि आरोपी महिलेची कामानिमित्त ओळख झाली. त्यानंतर महिलेने वेळोवेळी ईमेल, टेक्स्ट मेसेज, व्हाट्सॲप मेसेजद्वारे फिर्यादीला संपर्क केला. फिर्यादीच्या हॉटेल्समार्फत ५४ लाख रुपयांची खंडणी मागितली.

दरवर्षी सहा कार्यक्रम आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी तीन लाख रुपये, असे सलग तीन वर्ष कार्यक्रम आयोजित करण्याची महिलेने मागणी केली. काम अथवा पैसे न दिल्यास फिर्यादी आणि फिर्यादीच्या हॉटेल ग्रुपची बदनामी करण्याची आरोपी महिलेने धमकी दिली. ताज हॉटेल आणि फिर्यादी यांच्या हॉटेल ग्रुपचे डायरेक्टर यांना फिर्यादी यांच्याविषयी खोटे सांगून फिर्यादीची बदनामी केली. 

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा प्रकार मुंबई येथे घडला असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई शहर येथील खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpri-acपिंपरी