शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केला नऊ वर्षीय मुलाचा खून; बारामती तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:47 IST

Crime News : बारामती तालुक्यातील होळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Crime News : बारामती तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील होळ येथील नऊ वर्षी मुलाची बापानेच हत्या केल्याचे समोर आले आहे,  बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.

ममता यांच्या राजवटीत पहिला 'एन्काउंटर'! व्हॅनमधून पळून जाताना माफियाला पोलिसांनी केलं ठार

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,मुलगा अभ्यास करत नाही यामुळे वडीलांनी मुलाला रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला. १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणार दिसतोयस, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले. यात त्याचा मृत्य झाला. पियुषची आजी हे सर्व पाहत होती पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही. त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहिती तिने दिली. 

संतोष भंडलकर याने डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे न नेता आणि मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगत नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली.

पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात त्याच्या वडिलांनीच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस