शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

बारामतीत जादा दराने हँडवॉश विक्री करणाऱ्या एका मॉलच्या मालकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 17:07 IST

या मॉलमध्ये हॅण्डवॉशची निर्धारित किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत असल्याची एका ग्राहकाची तक्रार

ठळक मुद्दे..कोरोनाच्या परिस्थितीत कायद्याचा धाक कायम 

बारामती : कोरोनाच्या संकटात देखील सर्वसामान्यांची गरज ओळखुन आपले उखळ पांढरे करणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी एमआयडीसी परिसरातील एका मॉलच्या मालकावर हँडवॉशची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जळोचीचे गाव कामगार तलाठी सदाशिव चोरमले यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. १) रोजी ही घटना घडली. या मॉलमध्ये हॅण्डवॉशची निर्धारित किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत असल्याची तक्रार एका ग्राहकाने तहसील कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी चोरमले यांच्यासह काटेवाडीचे तलाठी महेश मेटे यांना यांसंबंधी कारवाईचे आदेश दिले होते. या दोघांनी मॉलमध्ये ग्राहक म्हणून जात दोन हॅण्डवॉश खरेदी केले. त्याचे रितसर बिल घेण्यात आले. निर्धारित किमतीपेक्षा ते जादा असल्याचे दिसुन आले. याबाबत मालक वैभव गांधी यांच्याकडे त्यांनी चढ्या भावाबाबत तसेच रिफिलवर केलेल्या खाडाखोडीबाबत विचारणा केली .त्यावर गांधी यांनी वरूनच तसा माल आला असल्याचे उत्तर दिले. मूळ १८९ रुपयांच्या किमतीऐवजी २८० रुपयांना येथे हॅण्डवॉश विकला जात होता.  त्यानुसार हॅण्डवॉशची चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी येथील एमआयडीसीतील सिटी सेंट्रल मॉलचे मालक वैभव राजकुमार गांधी यांच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात फसवणूक तसेच कलम १८८, राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ व साथीच्या रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.——————————————————..कोरोनाच्या परिस्थितीत कायद्याचा धाक कायम दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी ' सिंघम ' स्टाईलने लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईस सुरवात केली आहे.त्यामुळे काळा बाजार करणाऱ्यां चे धाबे  दणाणले आहेत.लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना कैदेची शिक्षा,कोरोनाग्रस्त रुग्णाची ओळख जाहिर करणाऱ्यांसह व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर गुन्हा, नियमांचा भंग करणाऱ्या दुकानदारांवर देखील पोलीसांनी कारवाई केली आहे.त्यामुळे बारामती शहरात पोलीसांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीमध्ये कायद्याचा धाक कायम ठेवल्याचे चित्र आहे. ———————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस