सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळणाऱ्या ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST2021-05-22T04:10:57+5:302021-05-22T04:10:57+5:30

पुणे : सार्वजनिक ठिकाणी पत्र्याची शेड टाकून मटका जुगार खेळत असलेल्या आठ जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

Crime filed against 8 people for gambling in public places | सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळणाऱ्या ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळणाऱ्या ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे : सार्वजनिक ठिकाणी पत्र्याची शेड टाकून मटका जुगार खेळत असलेल्या आठ जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून १ लाख ६८ हजार १९० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंत्री मार्केटजवळ मोकळ्या मैदानात पत्र्याचे शेड टाकून मटका जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली. त्याठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांना दिले. त्यांनी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाच्या सहकार्याने मटका जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा टाकला आणि आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crime filed against 8 people for gambling in public places