गुन्हे शाखेची ६ हॉटेलवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:24 IST2021-01-13T04:24:56+5:302021-01-13T04:24:56+5:30
पुणे : गुन्हे शाखेच्या ५ युनिटने शहरातील सर्व हॉटेलची चेकींग करण्याची मोहिम दोन दिवस हाती घेतली होती. त्यात कोरेगाव ...

गुन्हे शाखेची ६ हॉटेलवर कारवाई
पुणे : गुन्हे शाखेच्या ५ युनिटने शहरातील सर्व हॉटेलची चेकींग करण्याची मोहिम दोन दिवस हाती घेतली होती. त्यात कोरेगाव पार्क येथील एक हॉटेल तसेच हॉटेल एच क्यु येथे हुक्का पुरवठा केला जात असल्याचे आढळून आले. दोन्ही हॉटेलवर कारवाई केली. युनिट १ने १३ हॉटेलची तपासणी केली. त्यात ६ रायझिंग स्टार टोळीचे सदस्य आढळून आले. युनिट दोन ने कोरेगाव पार्कमधील हुक्का विक्री करणार्या हॉटेलचालकावर कारवाई केली.
युनिट ४ ने केलेल्या तपासणीत ६ हॉटेल दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक काळ चालू असल्याचे आढळून आले. हॉटेल एमआरपी, हाॅटेल एलिफंटा (दोन्ही कल्याणीनगर), हॉटेल रुड लॉन्च, एट मुट सेट, माफिया हॉटेल, काफिला हॉटेल (सर्व विमाननगर) या हॉटेलवर खटले भरल्याची माहिती पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी दिली.