शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हातावरील टॅटूवरून शोधला अल्पवयीन मुलीच्या बाळाचा बाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 18:03 IST

बारामती: अल्पवयीन मुलीला फुस लावत तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी युवकावर बलात्कार आणि पॉस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल त्याला अटक ...

बारामती: अल्पवयीन मुलीला फुस लावत तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणी शहर पोलिसांनी युवकावर बलात्कार आणि पॉस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे. या आरोपी युवकाला पोलिसांनी नाव माहित नसताना त्याच्या हाताच्या  ‘टॅटू’वरुन शोध घेत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसमवेत ससून रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी गेली होती. मुलगी बारामतीची असल्याने शहर पोलीसांनी याबाबत तेथील पोलीसांनी माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहचत पीडित मुलीचा व तिच्या आईचा जबाब नोंदवला.

मोरगाव रस्त्याकडे एका शाळेत जात असताना तिची एका मुलाबरोबर ओळख झाली. दोन-तीन वेळा तो तिला रस्त्यातच भेटला. त्याने तिला फूस लावले. त्यातून त्यांचे निरा डावा कालव्यालगत काहीवेळा शारीरिक संबंध आले. त्यातून ती गरोदर राहिली. समाजात व बारामतीत चर्चा होईल म्हणून आईने मुलीला ‘ससून’मध्ये नेले. पोलिसांनी मुलीकडे आरोपीबद्दल चौकशी केली. मात्र, त्याच्या हातावर बदाम व हातावर सागर असे गोंदलेले आहे. या व्यतिरिक्त कोणतीही माहिती पीडित मुलीने व तिच्या आईकडे नव्हती. मुलीने दिलेल्या वर्णनावरून गोपनीय पध्दतीने पोलीसांनी तपास सुरू केला.

या तपासात सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ (वय २५, धंदा क्लिनर, रा. गोजुबावी, ता. बारामती, मूळ रा. लक्ष्मीनारायण नगर, बारामती शहर ) असे त्या युवकाची नाव असल्याची माहिती पुढे आली. ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्या हातावर टॅटूचे वर्णन देखील मिळून आले. भा.द.वि. कलम ३७६ व पॉस्को कायद्याप्रमाणेच्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ अटक केली. या प्रक़रणी आरोपीसह, अल्पवयीन मुलगी आणि गर्भाची ‘डीएनए’ तपासणी करण्यासाठी रासायनिक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.

प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सदर गुन्हा उघड करण्यासाठी आदेश दिले होते. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे तुषार चव्हाण, मनोज पवार, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, बंडू कोठे, यांनी तपास करून कौशल्याने उघड केलेला आहे. पीडित मुलीकडून कोणतेही नाव माहीत नसताना केवळ  हातावरील टॅटूवरुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड