शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:12 IST

वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे कर्तव्य असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सांभाळ न करता त्यांना घराबाहेर काढणाऱ्या दोन मुलांवर आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर - वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे कर्तव्य असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सांभाळ न करता त्यांना घराबाहेर काढणाऱ्या दोन मुलांवर आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या कायदा कलमान्वये अशा प्रकारे प्रथमच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात या मुलांच्या ६४ वर्षे वयाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसमवेत राहतात. कवडीपाट टोलनाका परिसरात त्यांनी एक गुंठा जागा खरेदीखताने घेतलेली असून तेथे बांधण्यात आलेल्या तीन खोल्यांपैकी एकीमध्ये वृद्ध दाम्पत्य, तर शेजारच्या खोलीत मोठा मुलगा त्याची पत्नी एका मुलासह आणि त्याशेजारील खोलीत दोन नंबरचा मुलगा पत्नी व दोन मुलांसमवेत राहतो.त्यांचे आई-वडील दोघे वयस्कर झाले असल्याने त्यांना काम होत नाही. दोन वर्षांपासून हे वृद्ध दाम्पत्य दोन्ही मुलांना आपला सांभाळ करण्याची वारंवार विनंती करीत होते. सांभाळ करणे दूरच; उलट त्यांच्या दोन्ही मुलांनी ‘आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे सांगून आई-वडिलांना घरातून बाहेर काढले आहे. यामुळे हतबल झालेल्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र