नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्यासह तीन जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:11 IST2021-04-15T04:11:34+5:302021-04-15T04:11:34+5:30

सरपंच योगेश नामदेव पाटे, अनिल दादा खैरे व सुनील रामदास खैरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक ...

Crime against three persons including Yogesh Pate, Sarpanch of Narayangaon | नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्यासह तीन जणांवर गुन्हा

नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्यासह तीन जणांवर गुन्हा

सरपंच योगेश नामदेव पाटे, अनिल दादा खैरे व सुनील रामदास खैरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेली माहिती अशी की, अरुण मार्तंड पाटे (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी १५ ऑगस्ट २०१७ झालेल्या मारहाणीची दाद मागत जुन्नर न्यायालयात फौजदारी आचारसंहिता कलम १५६/३ प्रमाणे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जुन्नर न्यायालयाने सरपंच योगेश नामदेव पाटे व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नारायणगाव पोलिसांना दिले. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र या घटनेत सरपंच योगेश नामदेव पाटे, अनिल खैरे व सुनील खैरे या तीन जणांवर त्या वेळी गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे फिर्यादी अरुण पाटे यांनी न्यायालयाकडे दाद मागितली होती. या घटनेमधील सचिन सुरेश नरवडे, संदीप सुरेश नरवडे , सोमनाथ मारुती तोडकरी, विकास शंकर म्हस्के, कमलेश किसन गावडे व सुजित संजय गाडेकर यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.

Web Title: Crime against three persons including Yogesh Pate, Sarpanch of Narayangaon