भाजपा नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा

By Admin | Updated: February 25, 2017 02:31 IST2017-02-25T02:31:59+5:302017-02-25T02:31:59+5:30

राजकीय वैमनस्यातून भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या मुलाने साथीदारांसह जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या

Crime against the son of BJP corporator | भाजपा नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा

भाजपा नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा

पिंपरी : राजकीय वैमनस्यातून भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या मुलाने साथीदारांसह जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या हॉटेलमधील आचाऱ्याला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी नगरसेवकाच्या मुलासह २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे नगरसेवक नखाते यांचा मुलगा शुभम नखाते याने साथीदारांसह थोपटे यांच्या हॉटेलात गोंधळ घातला. तेथील आचाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी शुभमसह शशिकांत नखाते, स्वप्निल नखाते, सुभाष नखाते, मोरेश्वर नारायण नखाते, विजय कडू, सागर झांबरे, दीपक पवार, दाद्या माने, नवनाथ पवार, सुनील दळवी, आकाश प्रल्हाद नखाते, प्रवीण नखाते, प्रवीण शेंडगे, अमित भुरुक, प्रवीण सोंडकर, ऋषीकेश चव्हाण, बाळा गोडगिरे, अभिजीत भालके, विनोद नखाते, अमोल शंकर नखाते, प्रवीण झांजे, अविनाथ नखाते
(सर्व रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अण्णासाहेब कुरुळे (वय २९, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Crime against the son of BJP corporator