दंडुकेशाही करणार्या पोलिसांवर गुन्हा
By Admin | Updated: May 26, 2014 05:17 IST2014-05-26T05:16:51+5:302014-05-26T05:17:21+5:30
विनायक धारणे व अमर निंबाळकर या दोघा तरूणांना एस. पी. देवकर यांनी दुकानात कोंडून ठेऊन बेदम मारहाण केली.

दंडुकेशाही करणार्या पोलिसांवर गुन्हा
पुणे : बाजीराव रस्त्यावरील एका दुकानामध्ये शुक्रवारी रात्री पान खाण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांना मारहाण केल्याप्रकरणी उपनिरीक्षक एस. पी. देवकर विरूध्द मारहाण, दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक धारणे व अमर निंबाळकर या दोघा तरूणांना एस. पी. देवकर यांनी दुकानात कोंडून ठेऊन बेदम मारहाण केली. याप्रकरणाी त्याच्याविरूध्द भादंवि कलम ५०४, ५०६, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणस प्लाझामधील दुकानामध्ये रात्री अकराच्या सुमारास धारणे व निंबाळकर दुकानात थांबले असताना पोलीस दुकानाचे शटर बंद करून निघून गेले होते. त्यानंतर धारणे यांनी सहायक पोलीस आयुक्तांकडे फोनवरून तक्रार केली. त्यानंतर देवकर त्याठिकाणी आले, त्यांनी वरिष्ठांना फोन कोणी केला म्हणून विचारणा केली. धारणे यांनी फोन केल्याचे सांगितल्यानंतर त्यांना पोलीस चौकीमध्ये नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. (प्रतिनिधी)