पुण्यात महावितरणच्या अधिका:यांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: October 4, 2014 02:23 IST2014-10-04T02:23:43+5:302014-10-04T02:23:43+5:30
वीज वाहिनी तुटल्यामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महावितरणच्या दोन अभियंत्यांसह एका कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात महावितरणच्या अधिका:यांविरुद्ध गुन्हा
>पुणो : वीज वाहिनी तुटल्यामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महावितरणच्या दोन अभियंत्यांसह एका कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 25 सप्टेंबरला घडलेल्या या दुर्घटनेत एका महिलेसह तरुणाचा विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला होता.
सह कार्यकारी अभियंता विक्रांत मोहन ओहोळ (रा. अशोकनगर, खडकी), उप कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय (रा. कोथरुड) व लाईनमन पांडुरंग भाऊ ठोंगिरे (रा. भारतमातानगर, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक मोहन कालगुडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबरला संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास अंडी उबवणी केंद्राच्या पश्चिमेकडील रस्त्यावरील एमईएस गॅरीसन इंजिनीअरिंग कंपनीच्या मेनगेटसमोरच्या बाजूला झाडाची फांदी पडून वीज वाहिनी तुटून खाली पडलेली होती. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पुलाखाली पाणी साचले होते.
पुनम ¬षिकेश जोशी (33, रा. बाणोर) दुचाकीवरुन खडकी पुलाखालून जात होत्या. पाण्यामुळे गाडी बंद पडल्याने त्या गाडी ढकलत नेत असताना तुटलेल्या वीज वाहिनीवर पाय पडला. विजेचा धक्का बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अतिक भगवान शिंदे (25, रा. 8 मुळा रोड, खडकी) याचाही जीव गेला.
अतिकच्या नातेवाइकांनी दुर्घटनेच्या दुस:या दिवशी
मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन
केले होते. (प्रतिनिधी)