रात्रीच्या वेळी फिरताना आढळल्याने चार जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST2021-06-10T04:08:59+5:302021-06-10T04:08:59+5:30

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केला आहे. पहाटे दोनच्या सुमारास मंचर गावच्या हद्दीत महात्मा गांधी ...

Crime against four people found walking around at night | रात्रीच्या वेळी फिरताना आढळल्याने चार जणांविरुद्ध गुन्हा

रात्रीच्या वेळी फिरताना आढळल्याने चार जणांविरुद्ध गुन्हा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केला आहे. पहाटे दोनच्या सुमारास मंचर गावच्या हद्दीत महात्मा गांधी हायस्कूलच्या समोर बबन रामभाऊ गराटे (वय ४०, रा. घावटेमळा, ता. शिरूर), सचिन शामराव झेंडे (वय ३४, रा. हुडको कॉलनी, ता. शिरूर) हे कार (एमएच १२ पीएच ९०४८) तसेच प्रशांत ज्ञानेश्वर शिंदे (वय २४) व विशाल विलास भोर (वय २८, दोघेही रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) कार (एम.एच.१४ जे एच १२३८) मध्ये फिरताना आढळले. विनाकारण विना मास्क, गर्दी करून कोणत्याही प्रकारचा डिस्टन्स न ठेवता फिरून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.

Web Title: Crime against four people found walking around at night